मांस, मच्छीच्या दुकानांवर हातोडा; हातगाड्या, टपरी गोदामात जमा
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वरला अतिकमण, रहदारीला अडथळा ठरत असलेले बांधकाम तोडफोडीला प्रारंभ झाला आहे. मंगळवारी (दि. 6) सकाळी या मोहिमेला प्रारंभ झाला. त्र्यंबकेश्वर-इगतपुरीचे उपविभागीय अधिकारी जी. एस. टी. प्रणव दत्ता आणि तहसलीदार गणेश जाधव पाटील यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील मांस, मच्छीची दुकाने हटवली. त्यानंतर त्र्यंबकेश्वर शहरातील टॅक्सी स्टँडजवळ असलेले मटण विक्रीची दुकाने बंद केली. जेसीबीच्या मदतीने ओटा तोडला. त्यानंतर निवृत्तिनाथ रस्त्यावर असलेले सुकी मासळी विक्री दुकानावर हातोडा चालवला.
यावेळी हातगाड्या आणि टपरी ट्रॅक्टरमध्ये टाकून नगरपरिषदेच्या गोदामात जमा केले. यावेळी नगरपरिषदेचे कर अधिकारी विजय सोनार आणि पथक उपस्थित होते. कर अधिकारी विजय सोनार यांनी दुकानांची माहिती जिल्हा प्रशासन अधिकार्यांना दिली. कर अधिकारी विजय सोनार यांनी मांस, मच्छी विक्री करणार्या व्यावसायिकांना अगोदर पूर्वकल्पना देण्यात आलेली होती. तशी नोटीस बजावण्यात आलेली असल्याचे स्पष्ट केली. दरम्यान, ग्रामीण भागातील एका जमीनमालकाने आपल्याला कोणतीही नोटीस नव्हती असे सांगितले आहे. संत निवृत्तिनाथ यात्रा आणि सिंहस्थ कुंभमेळा या पार्श्वभूमीवर मांस, मच्छी विक्री दुकानांना बंदी केल्याचे सांगण्यात येत आहे.
साधू-महंत तसेच बहुतांश नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. साधू-महंतांनी मागणी केल्याप्रमाणे मांस, मच्छीसोबत मद्यविक्री बंद होणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराचे समोरच्या रस्त्यावर, भाजीमंडई असलेल्या मध्यवर्ती भागात तसेच नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर पेट्रोल पंपालगत अधिकृत दारू दुकाने आहेत. ते बंद होतील का, असा सवाल उपस्थित केला आहे.
उच्च न्यायालयात याचिका दाखल
अवैध, विनापरवाना केलेली बांधकामे, आरक्षण आणि तत्सम नियमांना बगल देऊन झालेले बांधकाम, सराकारी जमिनीवर असलेले अतिकमण, रहदारीला अडथळा करत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण करणारे बांधकाम या सर्वांवर संत निवृत्तिनाथ यात्रा आटोपल्यानंतर हातोडा पडणार असल्याचा अंदाज चर्चांंमधून व्यक्त होत आहे. याबाबतच्या याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. त्यांचे वेळोवेळी निकाल लागले. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून अवमान याचिकादेखील झालेली आहे. त्यामुळे यापुढील कालावधीत त्र्यंबकेश्वर शहरात मोठ्या प्रमाणात तोडफोड होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
त्र्यंबकेश्वरवासीय धास्तावले
आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता शहरात तोडफोड होणार असे वातावरण आहे. याबाबत आता प्रत्यक्ष सुरुवात झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. पहिल्या फेरीत मांस, मच्छी विक्री दुकाने तोडण्यात आली आहेत. यापुढील कालावधीत रस्ता रुंदीकरण, अतिकमण हटवणे यासाठी मोठ्या प्रमाणात तोडफोड होणार असल्याची चर्चा आहे.
Campaign to remove overhangs begins in Trimbakeshwar for Kumbh Mela
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…