पंचवीस जणांचा मृत्यू ; क्लब मालकाला अटक
पणजी :
पर्यटनासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या गोव्यात आगीची भीषण दुर्घटना घडली आहे. नाईट क्लबमधील आगीत किमान 25 जणांचा मृत्यू झाला. या आगीच्या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास नाईट क्लबमधील आगीची माहिती मिळाल्यानंतर आपत्कालीन पथके आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तर संबंधित अधिकार्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रात्रभर काम सुरू ठेवले.याप्रकरणी संबंधित नाइट क्लबला सील, तर क्लबच्या मालकाला अटक करण्यात आली आहे.
गोव्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी दुर्घटनेची माहिती देताना सांगितले की, अरपोरा येथील एका रेस्टॉरंट-कम-क्लबमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. रात्री 12 वाजून 4 मिनिटाला पोलीस नियंत्रण कक्षाला आगीची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. आग नियंत्रणात आणली असून, सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आगीतील एकूण मृतांची संख्या 25 आहे. पोलिस या घटनेचे कारण तपासून त्या आधारे कारवाई करणार आहेत. अधिकार्यांच्या माहितीनुसार जखमींना वैद्यकीय मदत आणि मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या एक्स सोशल मीडिया अकाउंटवरून दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं, उत्तर गोवा जिल्ह्यात झालेल्या आगीच्या दुर्घटनेनं खूप दुःख झालं आहे. यात मौल्यवान जीव गमावले गेले आहेत. शोकाकुल कुटुंबांना माझी मनापासून सहानुभूती आहे. या कठीण काळात त्यांना शक्ती मिळो. जखमी लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करते.
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, गोव्यासारख्या पर्यटनाच्या राज्यात ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सरकार या घटनेची चौकशी करणार आहे. चौकशीत आगीचे नेमके कारण तपासले जाईल. चौकशीत जबाबदार आढळणार्यांवर कायद्यानुसार सर्वात कठोर कारवाई केली जाणार आहे.तसेच, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मजिस्ट्रेट चौकशीचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधानांकडून शोक, दोन लाखांची मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. अग्नितांडवात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजारांची मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून केली जाणार आहे. दुर्घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरून संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. बाधितांना सर्वतोपरी मदत करा, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.
नाशिक : प्रतिनिधी पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकर्यांकडून विविध प्रयोगांच्या माध्यमातून उत्पादकतेत वाढ होते.…
नियोजनाचा दुष्काळ; 18 वर्षांपासून पाणीटंचाईचा फेरा त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी दक्षिण भारताला सुजलाम् सुफलाम् करणार्या गोदावरीच्या…
सरकारच्या नावे शोक संमेलन; विविध उपक्रम नाशिक : प्रतिनिधी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्रामच्या उभारणीसाठी…
नाशिकरोड : प्रतिनिधी नाशिक तालुक्यातील जाखोरी गावात श्रीदत्तात्रेय, हनुमान व बिरोबा महाराज यात्रोत्सव मोठ्या…
मुंबई : रविवारी संध्याकाळपर्यंत इंडिगो विमान कंपनीने प्रवाशांना एकूण 610 कोटींचे परतफेड (रिफंड) प्रक्रिया केली…
नाशिक : प्रतिनिधी नगरपरिषद निवडणुकीचा निकाल तब्बल अठरा ते वीस दिवस लांबल्यामुळे निवडणुकीतून उसंत मिळालेले…