चालकाचा ताबा सुटल्याने कार उतरली कालव्यात

पंचवटी : प्रतिनिधी

पंचवटी विभागातील नागरिकांना गंगापूर रोडकडे जाण्यासाठी गंगापूर डाव्या कालव्यावरून सोपा रस्ता पडतो. त्यासाठी नागरिक गंगापूर डाव्या कालव्यावरून सोयोजित गार्डन मार्गाचा वापर करतात. गंगापूर डाव्या कालव्याचा रस्ता अरुंद असून, एका बाजूला पाट तर दुसर्‍या बाजूला किमान पंधरा ते वीस फूट खोलगट भाग आहे. त्यामुळे या मार्गावर अनेकदा चारचाकी वाहन रस्त्याच्या खाली उतरल्याच्या घटना घडल्या आहेत. अशाच प्रकारे सोमवार, दि. 27 रोजी दुपारच्या वेळी एक चारचाकी वॅगन आर कारदेखील गंगापूर डाव्या तट कालव्यावरून रस्त्याच्या खाली उतरल्याची घटना घडली. मात्र, सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाही. शहरात सर्वत्र सिंहस्थ प्राधिकरणच्या अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सिंहस्थ प्राधिकरणच्या अंतर्गत मखमलाबाद परिसरातील गामणे मळा ते फडोळ मळादरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. पेठरोडवरदेखील रस्त्याचे काम सुरू आहे, त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे, त्यात वाहनचालकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. खड्डे टाळण्यासाठी मखमलाबाद, पेठरोडकडे जाणारे बहुतांश चाकरमाने पर्यायी मार्गाचा अवलंब करीत डावा तट कालवा मार्गाने मार्गक्रमण करतात. गंगापूर रोडकडे शाळा, महाविद्यालय, उच्च महाविद्यालय, शासकीय, निमशासकीय कार्यालय, सातपूरकडे एमआयडीसीसह विविध कंपन्या आहेत. ते टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे दिंडोरी रोडकडून तसेच पंचवटीकडून जाणार्‍या नागरिकांना गंगापूर रोडकडे जाण्यासाठी रोज मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग जात येत असतो. सोमवार, दि. 27 रोजी एक चारचाकी वाहनचालकाने या पर्यायी मार्गाचा अवलंब केला. मात्र, या मार्गाहून मार्गक्रमण करणार्‍यांची संख्या अधिक असल्याने समोरील वाहन रस्त्याने पास होण्यासाठी बाजूस घेण्यास गेले. मात्र, त्याचे चारचाकी वाहन रस्त्याच्या खाली उतरले, सुदैवाने अनर्थ टळला आहे. स्थानिक रहिवासी शेतकरी यांच्या मदतीने सदर चारचाकी वाहन काढण्यास यश मिळाले.

Car plunges into canal after driver loses control.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *