कॅराव्हॅनचा पर्याय केवळ मुंबई, पुण्यातच

वाहनेच नसल्याने पर्यटकांची अडचण

नाशिक ः देवयानी सोनार

 

पर्यटनस्थळी निवास व्यवस्था असेलच असे नाही, त्यामुळे एका दिवसात भटकंती करून मुक्कामाची सोय असलेल्या ठिकाणी पर्यटकांना यावे लागते. अशावेळी कॅराव्हॅन पर्यटनस्थळी नेऊन त्यामध्ये निवास करण्यासाठीची परवानगी पर्यटन विभागाकडून देण्यात प्रारंभ करण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत तीन कॅराव्हॅनला परवानगी देण्यात आली आहे. परदेशांप्रमाणे देशातील केरळ, गुजरात या राज्यात कॅराव्हॅनचा पर्याय उपलब्ध झाला आहे. याचप्रमाणे महाराष्ट्रातही कॅराव्हॅन किंवा कॅम्पर व्हॅनच्या माध्यमातून पर्यटनाला प्रोत्साहित करण्यात येत आहे.

 

 

खासगी कॅराव्हॅन असल्याने अद्याप नाशिकला सुरू झालेल्या नाहीत. मुंबई, पुण्यातच अशा कॅराव्हॅन आहेत. नाशिकमधील ट्रॅव्हर्ल्स, कॅराव्हॅन मालकांनी इच्छा दर्शविल्यास येथेही पर्यटनास चालना मिळेल, असे मत प्रादेशिक व्यवस्थापक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ जगदीश चव्हाण यांनी मांडले.

 

 

राज्यभरात तीन कॅराव्हॅनना पर्यटन विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे. ही वाहने कृषी पर्यटन केंद्र, एम.टी.डी.सी. निवासस्थाने किंवा खासगी हॉटेल यांच्या परिसरात उभी करता येणार आहे. कॅराव्हॅनसाठी बुकिंग कॅराव्हॅन आणि कॅराव्हॅन पार्क तसेच हायब्रिड पार्कची नोंदणी पर्यटन संचलनालयाच्या ुुु.ारहरीरीींीर्रींेीीळीा.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर करता येणार आहे.

 

 

या कॅराव्हॅनमुळे पारंपरिक निवास व्यवस्थेऐवजी वेगळा अनुभव, दूरच्या पर्यटनस्थळी सकाळ आणि सायंकाळचा अनुभव घेता येऊ शकतो. कौटुंबिक सहलीचे आयोजन, दुर्गम किंवा अविकसित निसर्गक्षेत्राच्या ठिकाणी मुक्काम करता येऊ शकतो.पर्यटनावर आधारित उद्योगांना चालना मिळू शकते. स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. ऐतिहासिक किल्ले, वारसास्थळे, टेकड्या, दुर्गम ठिकाणे, वनसंपदा, धरणे, लेणी, जंगले अशी अनेक पर्यटनाची ठिकाणे आहेत. अशा ठिकाणी पक्की घरे किंवा हॉटेल निवासव्यवस्था कमी उपलब्ध असतात किंवा पर्यटन स्थळांपासून दूर असतात अशा वेळी कॅराव्हॅनचा उत्तम पर्याय आहे.

 

 

या कॅराव्हॅनची नोंदणी पर्यटन संचलनालयाकडे आवश्यक आहे.पर्यटन संकल्पनेमुळे पर्यटकांना राहण्याची सुविधा तसेच खासगी गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळणार आहे. कॅराव्हॅन पार्कमध्ये मूलभूत सोयीसुविधांनीयुक्त अशा जागेवर ही पार्क उभी करून मुक्काम करता येणार आहे. मात्र, सध्या राज्यात कॅराव्हॅन पार्क उपलब्ध नसल्याने परवानगी देण्यात आलेल्या तीन कॅराव्हॅन राज्यातील कृषी पर्यटन केंद्रे, एमटीडीसी, निवासस्थाने किंवा खासगी हॉटेल परिसरातच उभी करावी लागणार
आहेत.

परदेशात कॅराव्हॅन कॉमन आहे. हळूहळू भारतात सुद्धा कॅराव्हॅनची सुरुवात होऊ लागली. मग त्या भाडेतत्त्वावरसुद्धा देणे किंवा स्वतः घेऊन फिरणे ही प्रथा सुरू होत आहे, ही नक्कीच चांगली बाब आहे. यामुळे व्यवसायवृद्धी होण्यास मदत होईल. याचा उपयोग ज्या ठिकाणी हॉटेल किंवा रिसॉर्ट उपलब्ध नसतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. नाशिकचा विचार केलास कॅराव्हॅन जर उपलब्ध झाल्यास त्याचा फायदासुद्धा सर्वांना होऊ शकतो.

– राजेंद्र बकरे, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन नाशिक,
अध्यक्ष, टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन, नाशिक

 

 

 

 

मुंबई, पुण्याचे पर्यटक नाशिक किंवा इतर पर्यटनस्थळांवर येतात. भंडारदरा किंवा इतर धरणक्षेत्रात, गडकिल्ले अशा ठिकाणी राहण्याची व्यवस्था नाही, परंतु पर्यटकांना तेथे थांबायचे आहे अशा वेळी कॅराव्हॅनचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. खासगी कॅराव्हॅन असल्याने अद्याप नाशिकला सुरू झालेल्या नाहीत. मुंबई, पुण्यात अशा कॅराव्हॅन आहेत. नाशिकमधील ट्रॅव्हर्ल्स, कॅराव्हॅन मालकांनी इच्छा दर्शविल्यास इथेही पर्यटनास चालना मिळेल.

 

 

जगदीश चव्हाण
प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

Bhagwat Udavant

Recent Posts

दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले

दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले महिला गंभीर जखमी; सातपूरची घटना सातपूर : प्रतिनिधी सातपूर नाशिक…

20 hours ago

स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली

स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली सिडको : विशेष प्रतिनिधी चुंचाळे…

2 days ago

नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी

नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी मनमाड :आमिन…

2 days ago

पतीला जामीन मिळवून देण्याचा बहाणा करून युवतीवर अत्याचार

बलात्काराच्या घटनेने नाशिक हादरले पतीला जामीन मिळवून देण्याचा बहाणा करून युवतीवर अत्याचार   नाशिक :प्रतिनिधी…

7 days ago

विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना राष्ट्रपती पदक

विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना राष्ट्रपती पदक नाशिक: प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पदक…

1 week ago

मखमलाबादचे भूमिपुत्र संजय दराडे यांना गुणवंत सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर

संजय दराडेंच्या रूपाने मखमलाबादच्या शिरपेचात तुरा " मखमलाबादचे भूमिपुत्र संजय दराडे यांना गुणवंत सेवेसाठी राष्ट्रपती…

1 week ago