डीआयडीटी’ महाविद्यालयात करिअर संधी परिसंवाद

नाशिक:  प्रतिनिधी

‘इंटेरिअर डिझायनिंग व फॅशन डिझायनिंग’ मधील करिअर संधी, या विषयावर परिसंवादाचे आयोजन डीआयडीटी तर्फे करण्यात आले होते. बुधवार दिनांक २१ जून रोजी सायंकाळी ४. ३० वा, डीआयडीटी कॅंपस येथे सदर कार्यक्रम संपन्न झाला. वास्तुविशारद राखी टकले व हर्षल कुंभार यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले.  फॅशन डिझायनर आशी लुथरा यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी केल्लेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे सीईओ अनिल बागुल, स्वराज बागुल, अदिती बागुल, उपप्राचार्य प्रतिमा चौधरी, मनीषा कोलते, सर्व प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

दर्शना पवारच्या खून प्रकरणातील फरार हंडोरेस अटक

 

‘डीआयडीटी’ हि नाशिक मधील कॉलेजरोडस्थित नामांकित संस्था आहे. इंटेरिअर व फॅशन डिझायनिंग मधील विविध कोर्सेस इथे उपलब्ध आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त डिप्लोमा, डिग्री व करिअर ओरिएंटेड प्रोफेशनल कोर्सेस ह्यांचा समावेश आहे.

खरंच फिट आहात का…? भाग – ३

 

संस्थेला नुकतीच ‘नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, मुंबई (‘एसएनडीटी) कडून मान्यता मिळाली आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून विद्यापीठाचे ‘बॅचलर इन डिझाईन’, हे अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेतमार्फत देण्यात आली आहे. चार वर्षाचे हे डिग्री प्रोग्रॅम असून त्यात इंटेरिअर डिझायनिंग व फॅशन डिझायनिंग मध्ये स्पेशलायझेशन करता येऊ शकते.
सदर अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासनाची स्कॉलरशिप मिळवता येते. ज्यामुळे एस. सी. / एस. टी. / एन टी. व व्ही. जे. एन टी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शंभर टक्के तर ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पन्नास टक्के स्कॉलरशिप उपलब्ध आहे.

 

चेहेडी महादेव मंदिराजवळ स्वतःच्या डोक्यात दोन गोळ्या झाडून आत्महत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *