मुंबई :
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची ’सीबीआय’मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात एक सविस्तर निवेदन देण्यात आले.या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि युवा नेते पार्थ पवार उपस्थित होते.
या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार सुनील तटकरे यांनी माहिती दिली की, अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला, त्या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या निवेदनाची दखल घेत राज्य सरकार उद्या केंद्र सरकारकडे या अपघाती मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः यासंदर्भात केंद्र सरकारशी आवश्यक तो पत्रव्यवहार करतील आणि त्यादृष्टीने पावले उचलली जातील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.
CBI probe into plane crash: Demand to Chief Minister
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…