दीड कोटीचे बक्षीस; राज्यात तिसर्या स्थानी
नाशिक : प्रतिनिधी
माझी वसुंधरा 5.0 अभियानांंतर्गत नाशिक महानगरपालिकेने विभागात प्रथम, तर राज्यात तृतीय क्रमांक पटकावत दीड कोटीचे बक्षीस मिळविले आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागाच्या माध्यमातून दरवर्षी सदर मोहीम घेतली जाते. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नाशिक महानगरपालिकेने 1 जून 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत पर्यावरण संवर्धनासाठी विविध कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविले.
ओला व सुका कचर्याच्या विलगीकरणाचे उत्कृष्ट काम, अद्ययावत प्रक्रिया अन् वाहतूक यामुळे राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत नाशिक महापालिकेला विभागात पहिल्या क्रमांकाचे दीड कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी नाशिक महापालिका नवव्या क्रमांकावर होती. कचरा वाहतुकीसाठी जीपीएसयुक्त वाहनांचा वापर, वेळापत्रकानुसार उचल आणि ऑनलाइन देखरेख यामुळे संपूर्ण साखळी अधिक पारदर्शक व परिणामकारक झाली आहे.
माझी वसुंधरा अभियान हे राज्य शासनाचे पर्यावरण संवर्धनावर आधारित महत्त्वाकांक्षी अभियान असून, त्याअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाते. नाशिक महापालिकेने कचरा व्यवस्थापन, हरित उपक्रम, ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक उपाययोजना या निकषांवर उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. शहरात कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी महापालिकेने घरपातळीवर ओला-सुका कचरा वेगळा करण्यावर भर दिला. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती मोहिमा, विशेष पथके, दंडात्मक कारवाई तसेच स्वच्छता मित्रांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला. परिणामी मोठ्या प्रमाणात कचरा स्त्रोेतावरच विलगीकरण होऊ लागला आहे. याशिवाय संकलित कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आली असून, कचर्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे.
या गोष्टींचा झाला विचार
दिलेल्या निर्देशानुसार नाशिक महापालिकेने विभागांतर्गत वर्षभर विविध उपक्रम राबवून पर्यावरणाचे जतन व संवर्धन चांगल्या प्रकारे केले आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रामध्ये भारतीय प्रजातींच्या वृक्षांची लागवड, धूळ नियंत्रण, नवीन हरित क्षेत्रांची निर्मिती, तसेच दैनंदिन जमा होणार्या ओला व सुका कचरा प्रकल्प कार्यान्वित करणे, कचर्याचे व्यवस्थापन तसेच प्लास्टिकबंदी मोहीम सातत्याने सुरू याशिवाय मनपाच्या मालकीच्या इमारतींवर सोलर पॅनल उभारण्यात आले. शहरात 20 चार्जिंग स्टेशन सुरू करून पथदीप एलईडी लावण्यात आले. 13 एसटीपी असून, पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण नियमित केले जाते. पर्यावरण जनजागृती करण्यात येत असून, प्रदूषण रोखण्यासाठी मनपाच्या पर्यावरण विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…