नियमांचे पालन करत शिवजयंती साजरी करा

 

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे : मंडळाचा होणार सत्कार

नाशिक : वार्ताहर

शिवजन्मोत्सव साजरा करतांना कायदा सुव्यवस्थेचे पालन करीत  सामाजिक व प्रबोधनात्मक देखावे सादर करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिल्या. मंगळवारी (दि 14) पोलिस आयुक्तलयातर्फे शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित शांतता समिती सदस्य व शिवजयंती उत्सव समिती मंडळांच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर उपायुक्त प्रशासन पौर्णिमा चौघुले,  उपायुक्त  दिनेशकुमार चव्हाण,  चंद्रकांत खांडवी,  मनपा उपायुक्त अर्चना तांबे , जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात, स्मार्ट सिटीचे अभियंता दिनेशकुमार वंजारी आदींसह सर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मनपा विभागीय अधिकार्‍यांसह इतर विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी  आयुक्त  शिंदे म्हणाले की,सामाजिक देखावे,  प्रबोधन,  व्याख्यान ,सांस्कृतिक कार्यक्रम घेत छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र तरुण पिढी पर्यत पोहचवण्याचा प्रयत्न करावा. सामाजिक दृष्टीकोनातून काम करा.याच यावर्षी  सामाजिक प्रबोधन करणार्‍या  मंडळांचा सन्मान करण्यात येईल.  पारंपरिक वाद्ययांना वापर करावा. शासनाच्या आदेशाप्रमाणे डिजेला कुठल्याही प्रकारची परवानगी नसणार आहे.  सर्व मंडळांनी परवानगी घेऊन जयंती साजरी करावी. वेळेचे पालन करावे.   फलक बॅनरची  परवानगी घेणे आवश्यक असणार आहे.  त्यावरील मजकुरांची पोलिस पाहणी केल्यानंतर परवानगी  देण्यात येईल.  कुठल्याही देखावा सादर करतांना पोलिस त्यांची पाहणी केल्यानंतर परवानगी देण्यात येईल.कुठल्याही प्रकारे सामाजिक भावना दुखावणार यांची काळजी घ्यावी. पोलिस प्रशासन अहोरात्र आपल्या मदतीला आहे कुठल्याही समस्या असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. मिरवणूक ही साधारण दुपारी 2 वाजता काढण्यात येईल.  पोलिस महिलासह सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येईल.सर्व ठिकाणी सीसीटीव्हीची नजर राहिल.  मंडळांनी सीसीटीव्ही लावत स्वयंसेवकांची नेमणूक करावी.  रस्तावरील खड्डे व चालू असलेल्या कामाबाबत मनपा स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांना सूचना करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 194 मंडळांना परवानगी देण्यात आल्या आहेत.

यावेळी मनपा उपायुक्त अर्चना तांबे यांनी सांगितले की, मनपातर्फे ऑनलाइन  आतापर्यंत  194 मंडळांचे अर्ज आले असून, त्यांना परवानगी देण्यात आली आहेत.  मिरवणूक मार्गातील अतिक्रमणाबाबत लवकर कारवाई करण्यात येईल. रस्ताच्या कामाबाबत स्मार्ट सिटी च्या अधिकार्‍यांना सुचना करण्यात आल्या आहेत.

पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांनी शिवजयंतीच्या दिवशी  वाहतुकी संदर्भात आढावा घेऊन बदल करण्यात येईल. मंडळांच्या काही सूचना असल्यास पोलिसांना कळविण्यात याव्यात.  यावेळी उपस्थित मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी प्रश्न मांडले.प्रास्ताविक उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी केले. आभार उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी मानले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *