राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

गांधीनगरमध्ये घुमला शिवरायांचा जयघोष

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

गांधीनगर :
गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरमध्ये ’महाराष्ट्र समाज’तर्फे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शहा यांनी या सोहळ्याला गांधीनगरसाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असल्याचे म्हटले. हा पुतळा 21 फूट उंचीचा असून, तो गांधीनगरमधील नागरिकांना आणि विशेषतः युवा पिढीला अनेक दशके राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देत राहील, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि त्यांचे कार्य कधीही कालबाह्य होणार नाही. राष्ट्र त्यांच्या ऋणात सदैव राहील, अशा शब्दांत शहा यांनी महाराजांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. महाराष्ट्र समाजाने घेतलेला हा पुढाकार गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यातील सांस्कृतिक बंध अधिक दृढ करणारा ठरला आहे. ज्या काळात गुलामगिरीचा दाट अंधार होता, अशा कठीण परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी ’हिंदवी स्वराज्य’ स्थापन करण्याचा दृढसंकल्प केला. हा केवळ सत्तेचा बदल नव्हता, तर स्वाभिमानाचा आणि स्वराज्याचा उदय होता. या पुतळ्याच्या माध्यमातून शिवरायांचा देदीप्यमान इतिहास आता गुजरातच्या मातीतही तरुणांना धैर्याची आणि स्वाभिमानाची शिकवण देणार आहे.
गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरमध्ये ’महाराष्ट्र समाज’तर्फे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री शहा यांच्या हस्ते करण्यात आले. या पुतळ्याच्या माध्यमातून शिवरायांचा देदीप्यमान इतिहास आता गुजरातच्या मातीतही तरुणांना धैर्याची आणि स्वाभिमानाची शिकवण देणार आहे.

Chants of praise for Shivaji echoed in Gandhinagar.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पडोसन

पडोसन नावाचा विनोदी चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच.... एक -एक पात्र अतिशय विनोदी... तर अशीच…

4 hours ago

फुलोरा…

‘फार फार तर वारा बाहेरून येईल पण फुलून तर आतूनच यावे लागते..’ कविवर्य संजय चौधरी…

4 hours ago

श्रद्धा, ट्रेंड आणि माणूस

नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…

4 hours ago

आवडता कोपरा

खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…

4 hours ago

खंजीर आणि खाज

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…

4 hours ago

बांगलादेशमधील सत्तांतर

दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल घडला आहे. बांगलादेशमधील नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत दीर्घकाळ…

5 hours ago