गणेश भक्तांनी साधला दर्शनाचा योग

गणेश भक्तांनी साधला दर्शनाचा योग
नाशिक : प्रतिनिधी
अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त शहरातील सर्वच गणेश मंदिरांमध्ये गणेश भक्तांची दर्शनासाठी रीघ लागली होती. नवश्या गणपती, चांदीचा गणपती, साक्षी गणपती, इच्छामणी गणपती, ढोल्या गणपतीसह परिसरात असलेल्या वििंवध मंदिरात मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी झाली होती. नवश्या गणपती मंदिरातील गाभार्‍यात 151 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली होती. ही आकर्षक सजावट  भूषण गायकवाड  आणि अक्षय शिरसाठ यांनी केली.  रविवार कारंजावरील चांदीचा गणपती मंदिरात आकर्षक फूुलांची आरास करण्यात आली होती. गणेश मंदिरामध्ये विधीवत पूजा अर्चना करण्यात आली. ंंहोम, अभिषेक, आरती करत बाप्पाला दुर्वा,नारळ, फुल यासह मोदक आणि पेढ्यांचा नेवैद्य दाखवण्यात आला. तसेच दर्शनासाठी आलेल्या गणेशभक्तांना प्रसाद व फराळाचे वाटप मंदिर परिसरात करण्यात आले. नवीन वर्षातील पहिलीच अंगारक संकष्टी चतुर्थी असल्याने भाविकांमध्ये उत्साह जाणवत होता. संकष्टी चतुर्थी दर महिन्याला येते. पण अंगारक चतुर्थीचा योग वर्षातून दोनदा किंवा तीनदा येत असल्याने अंगारक संकष्टी चतुर्थीला यिशेष महत्त्व आहे. भाविक आवर्जून अंगारक चतुर्थीचा उपवास ठेवत असतात. कोरोना निर्बंधमुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच अंगारक चतुर्थी असल्याने भाविकांमध्ये उत्साह जाणवत होता चतुर्थीचा योग साधत गणपतीची मनोभावे पूजा करत बाप्पांच्या चरणी भाविक लीन झाले. सामान्य नागरिकांसह विविध मान्यवरांनीही गणपती मंदिरात जात बाप्पाचा आशीर्वाद घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *