गणेश भक्तांनी साधला दर्शनाचा योग
नाशिक : प्रतिनिधी
अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त शहरातील सर्वच गणेश मंदिरांमध्ये गणेश भक्तांची दर्शनासाठी रीघ लागली होती. नवश्या गणपती, चांदीचा गणपती, साक्षी गणपती, इच्छामणी गणपती, ढोल्या गणपतीसह परिसरात असलेल्या वििंवध मंदिरात मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी झाली होती. नवश्या गणपती मंदिरातील गाभार्यात 151 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली होती. ही आकर्षक सजावट भूषण गायकवाड आणि अक्षय शिरसाठ यांनी केली. रविवार कारंजावरील चांदीचा गणपती मंदिरात आकर्षक फूुलांची आरास करण्यात आली होती. गणेश मंदिरामध्ये विधीवत पूजा अर्चना करण्यात आली. ंंहोम, अभिषेक, आरती करत बाप्पाला दुर्वा,नारळ, फुल यासह मोदक आणि पेढ्यांचा नेवैद्य दाखवण्यात आला. तसेच दर्शनासाठी आलेल्या गणेशभक्तांना प्रसाद व फराळाचे वाटप मंदिर परिसरात करण्यात आले. नवीन वर्षातील पहिलीच अंगारक संकष्टी चतुर्थी असल्याने भाविकांमध्ये उत्साह जाणवत होता. संकष्टी चतुर्थी दर महिन्याला येते. पण अंगारक चतुर्थीचा योग वर्षातून दोनदा किंवा तीनदा येत असल्याने अंगारक संकष्टी चतुर्थीला यिशेष महत्त्व आहे. भाविक आवर्जून अंगारक चतुर्थीचा उपवास ठेवत असतात. कोरोना निर्बंधमुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच अंगारक चतुर्थी असल्याने भाविकांमध्ये उत्साह जाणवत होता चतुर्थीचा योग साधत गणपतीची मनोभावे पूजा करत बाप्पांच्या चरणी भाविक लीन झाले. सामान्य नागरिकांसह विविध मान्यवरांनीही गणपती मंदिरात जात बाप्पाचा आशीर्वाद घेतला.
या उमेदवारांचे विजय जवळपास निश्चित दिलीप बनकर ( राष्ट्रवादी अजित पवार, निफाड ) सुहास कांदे…
नाशिक: नांदगांव मतदार संघात चौदाव्या फेरी अखेर सुहास कांदे 50230 मतांनी आघाडीवर आहेत, येथे गणेश…
नाशिक: प्रतिनिधी संपूर्ण जिल्ह्यात राडा संस्कृतीमुळे गाजलेल्या नांदगाव मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे…
काजी सांगवी : वार्ताहर चांदवड देवळा मतदार संघात 8 फेऱ्या पूर्ण झाल्या आहे 8 फेऱ्या…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक पूर्व मधून भाजपचे राहुल ढिकले यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम…
नाशिक: प्रतिनिधी मालेगाव बाह्य मतदार संघातून दादा भुसे यांनी निर्णनयक आघाडी घेतल्यानंतर आता भुसे समर्थकांनी…