नाशिक शहर

सातपूर शिवजन्मोत्सव समितीतर्फे छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सत्कार

सातपूर शिवजन्मोत्सव समितीतर्फे छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सत्कार
सातपूर : प्रतिनिधी
नाशिक दौऱ्यावर असलेले खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातपूर  शिवजन्मोत्सव समितीला सदिच्छा भेट दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास उदयन राजेनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि शौर्य साडेतीनशे वर्ष झाले तरी कोणी विसरले नाही.. भोसले घराण्यात माझा जन्म झाला ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. महाराजांची जयंती जगभरात साजरी केली जाते.परंतु काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी वापर करत आहेत. काही दिवसापूर्वी एका व्यक्तीने महाराजांबद्दल एकेरी उल्लेख केला होता ..या गोष्टीचे वाईट वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे बोलणार्‍यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा. असे खासदार छत्रपती उदयनराजे म्हणाले.
यावेळी शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.समितीच्यावतीने कार्याध्यक्ष डॉ. वृषाली सोनवणे ,रोहिणी देवरे यांनी राजेंचे औंक्षण केले. शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन गांगुर्डे , समिती कार्याध्यक्ष डाॅ. वृषाली सोनवणे ,उपाध्यक्ष रोहिणी देवरे , सहसचिव हेमंत घुगे, दीपक वाघचौरे यांनी राजेंचा सत्कार केला.यावेळी नितीन निगळ,निवृत्ती इंगोले,किशोर निकम, नरेश सोनवणे  रवींद्र देवरे  यांच्यासह शिवजन्मोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

12 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

12 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

12 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

12 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

13 hours ago