मनपा अधिकार्यांना डांबर व सिमेंटची प्रतीकात्मक स्वरूपात भेट
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील विविध मुख्य व उपमार्गांवर अनेक खोल आणि धोकादायक खड्ड्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, वाहतुकीची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांचा रोष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने खड्डे दुरुस्तीसाठी निषेध आंदोलन करत मनपा अधिकार्यांना डांबर व सिमेंटचे प्रतीकात्मक स्वरूपात भेट
देण्यात आले.
छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने मनपा अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, नाशिक शहरातील रस्त्यांची अवस्था सध्याच्या पावसाळ्यात अत्यंत दयनीय झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी नाशिक सिव्हिल सर्जन डॉ. चारुदत्त शिंदे यांनी एक आदेश काढला होता की, नाशिक शहरातील रुग्ण जिल्हा रुग्णालयात पाठवू नये. त्या रुग्णांची तपासणी किंवा त्यांच्यावर उपचार हे महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये करावे, त्यामुळे त्या विषयावर आपण तात्काळ नाशिक जिल्हा रुग्णालय व नाशिक महानगरपालिका आरोग्य विभाग यांची बैठक घ्यावी. यापूर्वीही अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्षांनी वेळोवेळी आंदोलने व निवेदने देऊनही महापालिका कुंभकर्णाच्या निद्रिस्त अवस्थेत असल्यासारखी वागत आहे. त्यामुळे छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने हे निवेदन देत असून, आमच्या मागण्या तातडीने मान्य न केल्यास संघर्ष तेवढाच प्रखर व व्यापक होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी या आंदोलनात संस्थापक अध्यक्ष करण गायकर, शिवाजी मोरे, शिवा तेलंग, नवनाथ शिंदे, डॉ. किरण डोखे, आशिष हिरे, नवनाथ वैराग, योगेश गांगुर्डे, आबा पाटील, मनोरमा पाटील, सविता वाघ, गोरख संत, भारत पिंगळे, संजय तुपलोंढे, किरण लवंड, योगेश पाटील, गोकुळ धोंगडे, नारायण जाधव, शुभम महाले, अमोल शिंदे, ज्ञानेश्वर पालखेडे, राजाभाऊ खरात, विपुल तेलंग, जयेश मोरे, अमोल देवरे, मनीष तिवडे, अनुराग निकम, पंकज चौबे, महेश हिरे, दीपक पवार, विशाल घागस, दत्ता कवडे, संदीप हिरे, नवनाथ जगताप, इमरान खान, अनिल तिवारी, विजय भवर, पुंडलिक लांडगे, सिद्धांत घोटेकर, दत्ता महाराज पवार, रवींद्र जयस्वाल, ज्योती तिवारी, शोभा जाधव, भीमराव जाधव, संकेत पिंगळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्य मुद्दे व तातडीच्या मागण्या
शहरातील प्रमुख व उपमार्गांवरील खोल व विस्तीर्ण खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करावी. दररोज होणारे अपघात व जीवितहानी थांबवण्यासाठी सर्वांत जोखमीच्या ठिकाणी इमर्जन्सी पॅचवर्क हाती घ्यावे. वाहतुकीचा वेग मंदावल्याने निर्माण होणारे ट्रॅफिक जॅम तातडीने कमी करण्यासाठी प्रभावी योजना राबवावी.खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचा धोका वाढत असल्याने तात्काळ ड्रेनेज व नाल्यांची साफसफाई करावी. आतापर्यंत कागदोपत्री पूर्ण झालेल्या रस्त्यांच्या कामांची प्रत्यक्ष तपासणी करून दोषी कंत्राटदार व अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी. पुढील कामांकरिता गुणवत्तेची हमी व सार्वजनिक देखरेखीची पद्धत लागू करावी.
नाशिक शहरातील खड्डेही लोकांच्या जीवावर उठलेली आपत्ती आहे. त्यासाठी काल नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त यांना डांबर व सिमेंट देत महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. जर त्यांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले तर छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी महानगरपालिकेला देण्यात आला आहे.
-करण गायकर, छावा क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष
पाशा पटेल : साठवणुकीसाठी कार्यक्षम धोरणाची आवश्यकता लासलगाव : वार्ताहर साठवणूक आणि वाहतुकीदरम्यान तब्बल 80…
पूर्वीपासून तिरळेपणाकडे एक विनोदाचा भाग म्हणून पाहिले जाते. त्याचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम होतो. आपण…
(भाग 8) आजच्या युगात तंत्रज्ञानाने आपले जीवन सोपे केले असले, तरी त्याचवेळी त्याने अनेक नव्या…
मॉकड्रील असल्याने प्रेस कामगारांनी सोडला सुटकेचा निःश्वास नाशिकरोड : वार्ताहर सायंकाळी प्रेस सुटण्याच्या दरम्यान अचानकपणे…
ना. उदय सामंतांची निमात घोषणा नाशिक : प्रतिनिधी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने त्यांच्या नूतन प्रकल्पासाठी…
पळाशी : वार्ताहर नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणातून चाळीसगाव औद्योगिक वसाहतीची तहान भागविण्यासाठी 1500 क्यूसेक पाण्याचा…