मुंबई : राज्यात राजकीय घडामोडीला प्रचंड वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकारचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला असताना आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली पाठोपाठ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती कॉग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे. त्यामुुळे राजकीय घडामोडी घडत असताना राज्यपाल आणि मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने हा राजकीय कोरोना आहे का ? अशीही चर्चा रंगत आहे.