रोखले २ बालविवाह त्र्यंबकचे बालविकास प्रकल्पाधिकारी , ग्रामसेवक , अंगणवाडीसेविका आणि पोलीस यांची एकत्रित कारवाई
त्र्यंबकेश्वर : वार्ताहर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभाग आणि युनिसेफ यांची एकत्रित बैठक रावसाहेब थोरात सभागृहात घेण्यात आली होती . या बैठकीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणेतील सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा , असे निर्देश दिले होते . त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बालविकास प्रकल्पाधिकारी भारती गेजगे यांना रात्री ११ वाजता वावीहर्ष या गावात एका १७ वर्षीय मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली होती . त्याचबरोबर टाकेहर्ष येथे एका १६ वर्षीय मुलीचा बालविवाह होणार , अशी माहिती मिळाली . हे दोन्ही बालविवाह रोखण्यासाठी संबंधित दोन्ही गावांतील ग्रामसेवक , अंगणवाडीसेविका , पोलीस प्रशासन यांना संपर्क करून घटनास्थळी भेट देत कारवाई करण्यास सांगितले . , वावीहर्ष येथील ग्रामसेवक किसन राठोड , अंगणवाडी सेविका संगीता किर्वे यांनी गावातील बालविवाह होणाऱ्या कुटुंबात जाऊन संबंधित मुलगी व तिचे पालक यांची समजूत काढली . त्याचबरोबर टाकेहर्ष या गावातील ग्रामसेवक विजय आहिरे यांनी गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन समुपदेशन केले आणि विवाह थांबवला . काल रोजी झालेल्या बैठकीत बालविवाह रोखण्यासाठी सूचना करण्यात आल्यानंतर लगेचच त्र्यंबकेश्वरमध्ये संबंधित गावातील ग्रामसेवक व अंगणवाडीसेविका यांनी कारवाई केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले .
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…
सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…
नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…