आजच्या युगात तंत्रज्ञानाने आपले जीवन सोपे केले असले, तरी त्याचवेळी त्याने अनेक नव्या समस्या निर्माण केल्या आहेत. विशेषतः मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम हा चिंतेचा विषय बनला आहे. हा मुलांना प्रेम, समजूतदारपणा आणि मार्गदर्शनाने वाढवण्यावर केंद्रित आहे. पण आपण मुलांना खरंच योग्य मार्गदर्शन करतो आहोत का? की, आपण नकळत त्यांच्या आरोग्याला आणि भविष्याला हानी पोहोचवतो आहोत? आधुनिक जीवनशैली आणि मुलांच्या सवयी पूर्वीच्या काळात मुलांना खाण्यापिण्याच्या गोष्टी किंवा खेळणी मिळवण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागायची. पण आज, एका क्लिकवर सगळं उपलब्ध आहे. जंकफूड, पॅकेज्ड फूड, चॉकलेट्स, बिस्किटे यांचा सहज प्रवेश मुलांना मिळतो. पालक म्हणून आपणही बर्याचदा मुलांना जेवण कर, मग तुला हे मिळेल किंवा अभ्यास कर, मग टीव्ही बघू असे सांगतो. टीव्ही किंवा मोबाइल पाहत जेवण करणे याला आपण खाणे म्हणतो, पण खरेतर ते फक्त गिळणे आहे. मुलांचे लक्ष टीव्ही किंवा मोबाइलवर असते. त्यामुळे ते काय आणि किती खात आहेत, याकडे त्यांचे लक्ष नसते. अशा जेवणातून त्यांना पोषण मिळत नाही. टीव्ही आणि मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर परिणाम होतो. पण यापेक्षा गंभीर परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि वर्तनावर होत आहेत. स्क्रीन टाइममुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा, एकाग्रतेचा अभाव, बोलण्यात अडथळे आणि सामाजिक संवादात कमतरता दिसून येते. याशिवाय सततच्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे त्यांच्या झोपेच्या सवयीवरही परिणाम होतो, ज्यामुळे मानसिक ताण वाढतो.
मुलांना चॉकलेट, बिस्किटे, जंकफूड आणि पॅकेज्ड फूड यांचा सहज प्रवेश देऊन आपण त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवत आहोत. साखर आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमुळे मुलांमध्ये लहान वयात लठ्ठपणा, दातांचे आजार, कफाचे विकार आणि अगदी डायबेटिससारखे गंभीर आजार वाढत आहेत. यामुळे त्यांची पचनप्रक्रिया कमकुवत होते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. थोडक्यात, अशा सवयींमुळे आपण आपल्याच मुलांचे निरोगी आयुष्य कमी करतो आहोत.
ॠशपींश्रश झरीशपींळपस म्हणजे मुलांना दंड न करता, प्रेमाने आणि समजूतदारपणाने वाढवणे. मुलांना योग्य सवयी लावण्यासाठी मार्गदर्शन करणे, त्यांच्या गरजा समजून घेणे आणि त्यांना स्वतःच्या निवडीबाबत जागरूक करणे महत्त्वाचे आहे.
आपण काय करू शकतो
स्क्रीन टाइम मर्यादित करा. मुलांना टीव्ही किंवा मोबाइलशिवाय जेवणाची सवय लावा. जेवणाच्या वेळी त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना खाण्याचा आनंद घेता येईल असे वातावरण तयार करा.
मुलांना साखरयुक्त पदार्थांऐवजी फळे, सुकामेवा, तूप, लाडू, घरगुती पदार्थ द्या. त्यांना पौष्टिक खाण्याचे महत्त्व समजावून सांगा. प्रलोभनाऐवजी प्रेरणा द्या. जेवण कर, मग चॉकलेट मिळेल, असे म्हणण्याऐवजी त्यांना खाण्याचे फायदे समजावून सांगा. उदाहरणार्थ, पालक खाल्ल्याने तुला खूप ताकद मिळेल! मुलांना खेळ, व्यायाम आणि बाहेरच्या गोष्टींमध्ये सहभागी करा. यामुळे त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारेल. मुलांशी त्यांच्या आवडीनिवडींबद्दल बोला.
थोडक्यात काय, तर आपण मुलांना जे देतो, त्याचा थेट परिणाम त्यांच्या भविष्यावर होतो. ॠशपींश्रश झरीशपींळपस च्या माध्यमातून आपण त्यांना प्रेमाने, योग्य मार्गदर्शनाने वाढवू शकतो. जंकफूड, टीव्ही आणि मोबाइलच्या अतिवापरापासून त्यांना दूर ठेवून आपण त्यांना निरोगी आणि आनंदी आयुष्य देऊ शकतो.
पाशा पटेल : साठवणुकीसाठी कार्यक्षम धोरणाची आवश्यकता लासलगाव : वार्ताहर साठवणूक आणि वाहतुकीदरम्यान तब्बल 80…
पूर्वीपासून तिरळेपणाकडे एक विनोदाचा भाग म्हणून पाहिले जाते. त्याचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम होतो. आपण…
मॉकड्रील असल्याने प्रेस कामगारांनी सोडला सुटकेचा निःश्वास नाशिकरोड : वार्ताहर सायंकाळी प्रेस सुटण्याच्या दरम्यान अचानकपणे…
ना. उदय सामंतांची निमात घोषणा नाशिक : प्रतिनिधी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने त्यांच्या नूतन प्रकल्पासाठी…
पळाशी : वार्ताहर नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणातून चाळीसगाव औद्योगिक वसाहतीची तहान भागविण्यासाठी 1500 क्यूसेक पाण्याचा…
भक्तांनी केला ‘हर हर महादेव’चा गजर पंचवटी : प्रतिनिधी श्रावणातील तिसर्या सोमवारला अधिक महत्त्व असल्याने…