लासलगाव प्रतिनिधी
लासलगाव शहरातील सह्याद्री चौक परिसरात दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ३५ हजार रूपायांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना रविवार दि २२ मे रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या घडल्यामुळे परिसरातील महिलांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.
या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील सह्याद्री चौक,बस स्टॅन्डचे शेजारी असलेल्या गणेश नगर परिसरात राहणाऱ्या उषा गंगाधर हांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रविवार दि २२ मे रोजी त्या व त्यांचा नातू अंगणात असताना
सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी पाणी पिण्याचा बहाना करुन फिर्यादीच्या घरात प्रवेश केला व तुमच्या गळ्यातील सोन्याची चैनची डिझाईन छान आहे आम्हास तुमच्या सारखीच बनवायची आहे असे सांगुन गळ्यातील सोन्याची चैन फिर्यादीकडुन पाहण्यासाठी घेतली व आमचा मित्र दुध घेवुन येत आहे तो पर्यंत तुम्ही दुध घेण्यासाठी भांडे घेऊन या असे सांगितले नंतर फिर्यादी ही दुधासाठी भांडे घेण्यासाठी घरात गेली असता सदर दोन अनोळखी आरोपी हे घरातुन फिर्यादीची चैन घेवुन पळुन जाण्यात यशस्वी झाले.
या बाबत लासलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेतील पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहे.
नाशिकरोड : वार्ताहर युरेथ्रल स्ट्रिक्चर अत्याधुनिक पद्धतीने शस्रक्रिया कक्षींन आता सुरळीत करता येते. वारंवार यूरेथ्रा…
नाशिकरोड : वार्ताहर जैन धर्माचे 24 वे तीर्थंकार भगवान महावीर यांचा 2624 जन्मकल्याणक म्हणजे जन्मदिन…
चिमण्यांसाठी केली दाणापाण्याची सोय, शहा येथील भैरवनाथ विद्यालयाचा पर्यावरणस्नेही उपक्रम सन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील शहा…
पोलीस ठाण्यातच दोन पोलीस एकमेकांना भिडले नेमके काय कारण घडले? सिडको : विशेष प्रतिनिधी सरकार…
लासलगाव बाजार समितीच्या सभापतिपदी या नेत्याची निवड राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाचे…
अमेरिकेचा मोठा शत्रू अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुमारे ७५ देशांवर लादलेल्या जबर आयात शुल्कामुळे…