सिडको : दिलीपराज सोनार
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दत्त मंदिर बसस्टॉपजवळील देशी दारु दुकानाबाहेर दारुच्या नशेत एका इसमाच्या डोक्यात लाकडी दांडा टाकुन खुन झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली. उंटवाडी परिसरातील गणपत घारे (वय ५० वर्षे) असे मयताचे नाव आहे. गणपत घारे आणि आरोपी समोद कौर (वय ३५ वर्षे) हे दोघेही देशी दारु दुकानासमोर दारू पित बसले होते. किरकोळ कारणावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. या वादात समोद कौर याने लाकडी दांडक्याने गणपत घारे यांच्या डोक्यात जबर मार केला. या मारामुळे गणपत घारे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी अंबड पोलीस दाखल झाले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. दोघेही दारूच्या नशेत होते आणि नशेच्या अवस्थेतच हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…
महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…
आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावानजीक असलेल्या देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर…
शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन नाशिक: प्रतिनिधी जेष्ठ शिक्षक नेते, लखमापूरच्या कादवा स्कुल…