नाशिक शहर

सिडकोच्या घरांना कर्जासाठी बँकांचा हात आखडता

जाचक अटी, कर्जासाठी झिजवावे लागताहेत उंबरठे
नाशिक ः देवयानी सोनार
सामान्यांना परवडतील अशी घरे सिडकोने शहरवासीयांसाठी उपलब्ध करून दिली आहेत.सिडकोच्या एक ते सहा योजनांमध्ये वन रूम, वन रूम किचन अशी घरे उपलब्ध करून दिली. परंतु, वाढत्या कुटुंबाच्या गरजा पाहता सिडकोची मूळ घरे राहण्यासाठी अपुरी पडत असल्याने अनेकांनी सिडको कार्यालयाची बांधकाम परवानगी घेऊन घरांचा विस्तार करीत रूम वाढविणे, वरचा मजला वाढविणे अशी कामे केली. अनेकजण अजूनही करीत आहेत.
सिडको ही सामान्य नागरिकांची वसाहत आहे. त्यामुळे काही बचतीतून तर कर्ज घेऊन वाढीव बांधकाम नागरिक करीत असतात. त्यासाठी तारण म्हणून देण्यासाठी काही नसल्यास सिडकोच्या घरावरच कर्ज घेण्याचा प्रयत्न रहिवाशांकडून केला जातो. सिडकोची घरे फ्री होल्डचे घोंगडे अजूनही भिजत पडलेले आहे. सिडकोने योजना महापालिकेकडे हस्तांतरित केल्यामुळे आता बांधकामाची परवानगी मिळण्यासाठी पालिकेत जावे लागते. बांधकामाची परवानगी मिळण्यापासून तर विविध राष्ट्रीयीकृत, सहकारी, लघु कर्ज देणार्‍या बँकांच्या जाचक अटीमुळे कर्ज मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना आहे त्या जागेत राहण्याशिवाय गत्यंतर नाही. तसेच दुसर्‍या ठिकाणच्या घरांचे दर न परवडणारे असल्याने दुहेरी कोंडीत सिडकोवासीय सापडले आहेत. सहकारी अथवा खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज दिले जात असले तरी त्यांचा व्याजाचा दर अधिक आणि प्रोसेसिंग फीदेखील अवाच्या सवा असल्याने टुमदार घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होणे अवघड होऊन बसले आहे. कराराची घरे म्हणून राष्ट्रीयीकृत बँका कर्ज देण्यास नकार तरी देतात किंवा कागदपत्रे पूर्ण करता करता कर्ज नको पण कागदपत्रे आवर, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

आधी मोजा पैसे, नंतर कर्ज
जागेचे क्षेत्रफळ कमी, आर्किटेक्टचा प्लॅन, बांधकाम परवानगी, नगरपालिकेची परवानगी, सर्व कागदपत्रे, जमविल्यानंतरही बँका शेअर्स, जामिनदार, प्रोसेसिंग फी, करंट अकाउंट, लीगल आणि टेक्निकल ऍडव्हायजर यांची वेगळी फी असे सत्तर हजारांपर्यंत कर्ज घेण्यापर्यंतचा (यात बांधकाम परवानगी, नगरपालिका परवानगी, आर्किटेक्ट प्लॅन यांचा खर्च वेगळा) आणि एकूण खर्च पाहता दीड ते दोन लाखांच्या आसपास खर्च करूनही कर्ज कमी मिळते.
अत्यल्प कर्ज मंजूर
कागदपत्रे पूर्ण करूनही दहा ते पंधरा लाख कर्जाची गरज असताना प्रत्यक्षात हातात. पाच ते आठ लाखांपर्यंतच कर्ज मिळू शकते.
फायनान्स कंपन्यांकडून कर्ज जास्त व्याजदराने घेऊन बांधकामाची गरज भागविली जात असली तरी फायनान्स कंपन्यांकडून आकारण्यात येणार्‍या जादा व्याजदराचा, प्रोसेसिंग फीच्या नावाखाली अवाच्या सवा रक्कम खर्च करण्याची वेळ आली आहे.

नोकरदार असेल तर पेमेंट स्लीप, व्यावसायिक असेल तर इन्कम टॅक्स रिटर्नचे तीन वर्षांचे रेकॉर्ड आदींसह कर्ज घेण्यासाठी सिबील स्कोअरदेखील चांगला असणे गरजेचे असते. त्यावर त्या व्यक्तीची आर्थिक व्यवहारांची कुंडली मांडलेली असल्याने बँकाही सर्व व्यवहार आणि कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय कर्ज मंजूर करीत नाहीत.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

33 minutes ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

36 minutes ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

50 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

54 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

58 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 hour ago