बुस्टर डोसकडे नागरिकांचा यूटर्न
तुटवड्याने नागरिक चिंतेत, सव्वा लाख लसींची मागणी
नाशिक ः प्रतिनिधी
कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्यामुळे नागरिकांमध्येही भीतीयुक्त वातावरण आहे. त्यामुळे आतापर्यंत बूस्टर डोसकडे पाठ फिरविलेले नागरिक आता बूस्टर डोस घेण्यासाठी रुग्णालयांकडे धाव घेत आहेत. मात्र, लसींचा पुन्हा एकदा तुटवडा निर्माण झाला असून, आरोग्य विभागाने सव्वा लाख लशींची मागणक्ष नोंदविली आहे.
कोरोनाच्या नवनवीन व्हेरींअंटमुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. लसीकरण अनेकांनी करून घेतले असले तरी अनेकांनी बूस्टर डोसकडे पाठ फिरविली होती. परंतु कोरोना रिटर्नमुळे नागरिकही बूस्टर डोसकडे यूटर्न घेत आहे. परंतु लसीकरण केंद्रांमध्ये लसींचा तुटवडा भासत असून कोविशील्ड, कोव्हॅक्सिनसह इतर लसींची मागणी करण्यात आली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी हर्षल नेहते यांनी सांगितले.
लसीकरणसाठी कोविशिल्ड 50 हजार,कोव्हिॅक्सिन 25 हजार,कोरविर्व्हक्स 15 हजार,इन्कोव्हॅक्स 25 हजार एकूण सव्वा लाखांच्या लसींची मागणी नोंदविण्यात आली आहे.
कोरोनाच्या वाढता प्रार्दुभावामुळे अनेकांनी लसीचा पहिला व दुसरा डोस घेतला होता.कोरोनाच्या नवनव्या व्हेरियंटमुळे बूस्टर डोसही घेण्यास वारंवार आवाहन केले जात होते. मध्येच नव्या व्हेरीयंट आणि तिसर्या लाटेच्या शक्यतेमुळे अनेकांनी हा डोस घेतलाही होता.परंतु कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने अनेकांनी बूस्टर डोसकडे पाठ फिरविली होती. कोरोनाचा नवा व्हेरिअंट आणि वाढते रुग्ण पाहता नागरिकांनी पुन एकदा आपला मोर्चा बूस्टरकडे वळविला आहे. लसीकरण केंद्रांवर लसी उपलब्ध होण्यास उशीर लागत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. त्यातच गेल्या तीन चार दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढीला लागली असल्याने नागरिकांची पुन्हा एकदा लसीकरणासाठी धावपळ पाहावयास मिळत आहे.
बूस्टर डोस घेतलेल्यांची संख्या
वयोगट 18 ते 44 – एक लाख 98 हजार 297
वयोगट 45 ते 60 – एक लाख 15 हजार 786
वयोगट 60 पुढील – एक लाख 48 हजार 306
एकूण- 5 लाख 50 हजार 136
कोविशिल्ड कोव्हॅक्सिनसह इतर सव्वा लाखांच्या लसींची मागणी करण्यात आली आहे. लसी उपलब्ध झाल्यास शक्य तितक्या लवकर लसीकरण सुरू करण्यात येईल.
डॉ.हर्षल नेहते
जिल्हा आरोग्य अधिकारी
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…