शहर पोलिसांच्या ताफ्यात २१ नवीन वाहने दाखल



– ना. भुसे यांनी दाखवला झेंडा…

नाशिक – (विशेष प्रतिनिधी)
शहर पोलिस दलाला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शहर पोलिस आयुक्तालयास २१ चारचाकी वाहन देण्यात आली आहे. पोलिस आयुक्त कार्यालयात या वाहनांचे लोकार्पण शनिवारी (दि. ८) पालकमंत्री दादा भुसे यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. यावेळी आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
गंगापूर रोड येथील पोलिस आयुक्त कार्यालयात दुपारी बारा वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मान्यवरांचे स्वागत पोलिस बँड पथकाने केले. शहर पोलिसांच्या ताफ्यात असलेल्या काही वाहनांची मोठी दुरवस्था झाली होती. काही वाहने तर चालण्याचे स्थिती देखील नव्हती. त्यामुळे नवीन वाहनांची सातत्याने मागणी करण्यात आली होती. ती पूर्ण झाल्यामुळे पोलिस दलाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आला. दरम्यान नवीन वाहनांमुळे अधिक गतीने काम होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. दोन कोटी रुपयांचा निधीतून दाखल झालेल्या नवीन वाहनांमध्ये महिंद्राच्या निओ बोलेरो १७, मारुती सुझुकी एर्टिगा ४ असे एकूण २१ वाहने सुमारे नाशिक पोलिस दलाला मिळाली आहेत.
——————————————————–

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने निधी मंजूर…

शहर पोलिसांना मिळालेली २१ वाहने जी.ई.एम. पोर्टलव्दारे खरेदी करण्यात आलेले आहे.त्यासाठी लागणारा निधी हा प्रशासकिय मान्यतेसह शासकिय खात्यावर उपलब्ध करुन घेण्यात आलेला आहे. ही वाहने पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या नावे रजिष्ट्रेशन झालेले आहेत.
जिल्हा नियोजन समिती निधीतून पालकमंत्री दादा भुसे यांचे पुढाकाराने १,९३,६५,१९१/- रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून नाशिक पोलिस दलात २१ चारचाकी वाहने मंजूर करण्यात आले होते. याप्रसंगी पोलिस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, किरण कुमार चव्हाण (परिमंडळ १), चंद्रकांत खांडवी (परिमंडळ – २) तसेच सर्व विभागीय सहायक पोलीस आयुक्त, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

20 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

20 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

20 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

21 hours ago