नाशिक: प्रतिनिधी नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि . अर्थातच सिटीलिंकच्या वतीने १ ) मार्ग क्रमांक २२८ नाशिकरोड रेल्वे स्टेशन ते चुंचाळे गाव , २ ) मार्ग क्रमांक २३८ नाशिकरोड रेल्वे स्टेशन ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठ •तसेच ३ ) मार्ग क्रमांक २३ ९ नाशिकरोड रेल्वे स्टेशन ते गंगावऱ्हे असे तीन नवीन मार्ग सोमवार दिनांक २५ एप्रिल २०२२ पासून सुरू करणार आहे . सदयस्थितीत सिटीलिंकच्या ४७ मार्गांवर एकूण २०२ बसेस धावत आहे . मात्र प्रवाशांची होणारी मागणी लक्षात घेता सिटीलिंक टप्प्याटप्प्याने अजूनही नवीन बसमार्ग सुरू करीत आहे . याच पार्श्वभुमीवर सोमवार दि . २५ एप्रिल २०२२ पासून तीन नवीन बसमार्ग सुरू करण्यात येत आहे . १ ) मार्ग क्रमांक २२८ नाशिकरोड रेल्वे स्टेशन ते चुंचाळे गाव • मार्गे व्दारका , शालिमार , नवीन सि बी एस , कामटवाडा असणार आहे . या मार्गावरील पहिली बस सकाळी ६.१० वाजता तर शेवटची बस १८.३५ वाजता सुटणार आहे .२ ) मार्ग क्रमांक २३८ नाशिकरोड ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठ मार्गे व्दारका , सि बी एस , आनंदवली , गंगापूर रोड असेल . नाशिकरोड ते मुक्त विदयापीठ पहिली बस सकाळी ८.४० वाजता सुटेल तर शेवटची बस १६.३० वाजता सुटेल . मुक्त विदयापीठ येथुन १८.०० वाजता नाशिकरोड करिता फेरी उपलब्ध आहे . ३ ) मार्ग क्रमांक २३ ९ नाशिकरोड ते गंगावऱ्हे मार्गे व्दारका , सी बी एस , आनंदवली , गंगापूररोड असेल . नाशिकरोड ते गंगावऱ्हे पहिली बस सकाळी ७.१० वाजता तर शेवटची बस २२.०० वाजता निघेल . व पंचवटी कनेक्शन करिता गंगाव हे ते नाशिकरोड रेल्वे स्टेशन ५.४५ वाजता व नाशिकरोड ते गंगावऱ्हे २२.०० वाजता फेऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत . अशाप्रकारे मार्ग क्र . २२८ , २३८,२३ ९ असे तीन नवीन मार्ग सोमवार पासून सुरू होत असून या बससेवेमुळे विदयार्थी , नोकरदार , कामगार यांची चांगली सोय होणार आहे . जास्तीत जास्त प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे .
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…