नाशिक

शहरातील वाहतूक बेटांना झळाळी

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील वाहतूक बेटांची झालेल्या दुर्दशेमुळे नागरिकांत नाराजीचे वातावरण असताना नूतन मनपा आयुक्त रमेश पवार यांनी या वाहतूक बेटांचा चेहरा मोहरा बदलण्यास सुरूवात केली आहे.शहरातील विविध भागात असलेल्या वाहतूक बेटांची स्वच्छता करण्याबरोबरच त्यांना रंगरंगोटीही केली जात आहे. रविवार कारंजा  येथील वाहतूक बेटाची गेल्या काही दिवसांपासून मोठी दुर्दशा झालेली होती. याठिकाणी असलेल्या गरुडाच्या प्रतिकृतीचा रंग उडाल्यामुळे याठिकाणच्या वाहतूक बेटाला अवकळा प्राप्त झाली होती. रविवार कारंजावरील हे वाहतूक बेट धुळमातीने पूर्ण भरले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून रविवार कारंजावरील वाहतूक बेटाच्या डागडुजीला प्रारंभ झाला आहे. रविवार कारंजावरील गरुडाच्या शिल्पाला रंगरंगोटी केल्यामुळे रविवार कारंजावरील वाहतूक बेट झळाळून निघाले आहे. याशिवाय शहरातील रेडक्रॉस चौकातील वाहतूक बेटाचीही स्वच्छता करण्यात आली आहे. शहरात अनेक वाहतूक बेटे आहेत. त्यातील काही बेटे विविध कंपन्यांनी त्यांच्या सीएसआर फंडातून ही वाहतूक बेटे उभारली आहेत. मात्र, नंतर महापालिका अथवा संबधितांनी त्याची निगा न राखल्याने या वाहतूक बेटांची दुर्दशा झाली आहे. या वाहतूक बेटांच्या
Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

18 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

18 hours ago