सिटीलिंक कर्मचारी संपावर; प्रवाशांचे प्रंचड हाल
नाशिक :प्रतिनिधी
सिटीलिंक कंपनीच्यावतीने शहरात सुरू असलेली बससेवा सकाळपासून असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.गेल्या तीन महिन्यांपासून पगार थकवल्याने कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारले आहेत.
महानगरपालिकेच्यावतीने गेल्या काही वर्षापासून सिटीलिंक बससेवा सुरू आहे. मात्र बससेवा सुरू झाल्यापासून अनेक कारणाने सिटीलिंक बससेवा वादात असते.त्यात कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार होत नसुन पगार थकवल्याने याआधीही सिटीलिंक कर्मचारी संपावर गेले होते.