सिटीलिंकच्या दिव्यांग मोफत पास योजनेचा 2902 दिव्यांगानी घेतला लाभ
नाशिक : प्रतिनिधी
शहरात गेल्या दीड वर्षापासून महानगरपालिकेच्यावतीने सिटीलिंक कंपनीमार्फत शहर बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेला अल्पावधीतच नाशिकरांनी उंदड असा प्रतिसाद दिला. त्यामुळे सिट लिंकच्यावतीनेही प्रवाशांच्या सोयीसाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात. त्यातील वन डे पास योजना, दिव्यांगासाठी मोफत पास योजना राबवण्यात आल्या. दिव्यांगासाठी मोफत पास योजना 1 नोव्हेंबरपासून राबवण्यात आली. यामध्ये 40 टक्के किंवा 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या प्रवाश्यांना सिटीलिंक बसने मोफत प्रवास करता येणार येत आहे. मात्र मोफत प्रवासासाठी सिटी लिंकने काही नियम व अटी ही ठरवून दिल्या आहेत .या अटी व नियमांची पूर्तता करत करत दिव्यांग नागरिक मोफत पास योजनेचा लाभ घेत आहेत. गेल्या अडीच महिन्यात 2 हजार 902 दिव्यांगानी मोफत पास योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच 65 टक्के किंवा 65 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्यास व मोफत प्रवासाचा पास असल्यास सोबत असलेल्या प्रवाशाला देखील तिकीटामध्ये 50 टक्के सवलत देण्यात येत आहे.. परंतु त्यासाठी पास काढतेवेळी सिटीलिंक सिस्टिममध्ये 65 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे अपलोड केलेले असावे लागते.
सिटी लिंकच्या विविध योजनांनाही नागरिकही उत्फुर्त प्रतिसाद देत आहेत.त्यामुळे येत्या काळातलही सिटी लिंककडून काही नवीव योजना राबवण्यात येणार का हे पाहावे लागेल.
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…