नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्यावतीने शहर बससेवा सुरू करण्यात आली. शहर बससेवेला नाशिककरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. परिणामी हीच बाब लक्षात घेत सिंटीलिंक कंपनीच्यावतीने दोन मार्गावरील बस सेवा विस्तारीत करण्यात आली तर तीन नवीन मार्गावर बस सेवा सुरू करण्यात आली. त्याचप्रमाणे उद्या मगंळवार ( दि.26) पासून विशेष स्वतंत्र महिला बस सुरू करण्यात येत आहे. शहरातील तीन मार्गांवर 8 फेर्यांच्या माध्यमातून या महिला विशेष बस धावणार आहे .पहिला मार्ग क्रमांक 101 फेरी क्रमांक 1) गंगापूर गाव ते निमाणीमार्गे बारदान फाटा , सातपूर , सिव्हिल , निमाणी सकाळी 9 .30 वाजता … तर फेरी क्रमांक 2 ) निमाणी ते गंगापूर गाव मार्गे सिव्हिल , सातपूर , बारदान फाटा , गंगापूर गाव 18.00 वाजता . दुसरा मार्ग क्रमांक 103 फेरी क्रमांक 1 ) अंबडगाव ते निमाणी मार्गे सिम्बॉइसिस , उत्तमनगर , पवननगर , निमाणी सकाळी 9 .25 वाजता … तर फेरी क्रमांक 2 ) निमाणी ते अंबडगाव मार्गे पवननगर , उत्तमनगर , सिम्बॉइसिस , अंबडगाव 18.00 वाजता . तिसरा मार्ग क्रमांक 266 – फेरी क्रमांक 1 ) नाशिकरोड ते निमाणी मार्गे व्दारका , शालिमार , सिबीएस , निमाणी सकाळी 9 .30 वाजता तर फेरी क्रमांक 2 ) निमाणी ते नाशिकरोड मार्गे सिबीएस , शालिमार , व्दारका , नाशिकरोड सकाळी 9 .30 वाजता फेरी क्रमांक 3 ) नाशिकरोड ते निमाणी मार्गे व्दारका , शालिमार , सिबीएस , निमाणी 18.00 वाजता . तर फेरी क्रमांक 4 ) निमाणी ते नाशिकरोड मार्गे सिबीएस , शालिमार , व्दारका , नाशिकरोड 18.00 वाजता महिला विशेष बस धावेल . उद्या पासून एकुण तीन मार्गांवर 8 फेर्यांच्या माध्यमातून धावणार्या या महिला विशेष बस सेवेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे .