नाशिक : प्रतिनिधी
सिटी लिंकच्या धडकेने जखमी झालेल्या एका वृद्धाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दोनच दिवसांपूर्वी सिडको भागातही एका युवतीला सिटी लिंक बसने धडक दिल्याने ती जखमी झाली होती. सिटी लिंक बसचे चालक सुसाट बस चालवितात. नियमांचे पालन करीत नाहीत, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हरिश कानडे (54) हे कामावरुन घरी परतत असताना त्यांना पंचवटीतील काट्या मारुती चौकात बसने धडक दिल्याने ते जबर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज त्यांचा मृत्यू झाला. याअपघाताबद्दल सारंग कानडे यांच्या फिर्यादीवरुन बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिटी लिंक बसच्या चालकांना कोणत्याच प्रकारचे प्रशिक्षण दिलेले नाही. सुसाट वेगाने बस चालवितात. गर्दीतूनही चालताना वेग कमी करीत नाही. त्यामुळे असे अपघात वारंवार होत असतात.
नाशिक: प्रतिनिधी शहरात टवाळ खोरांनी मोठा उच्छाद मांडला असून, वाहनांच्या काचा फोडणे, तोडफोड करणे, कोयता…
नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज शासनाने बदल्या केल्या. नाशिकचे पोलीस अधीक्षक म्हणून पालघर…
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…