प्रभाग पाचमध्ये भाजप-शिंदेसेनेची प्रतिष्ठा पणाला
नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमधील काही प्रमुख लढतींपैकी प्रभाग क्रमांक पाचमधील लढतीकडे शहराचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काळात महापौर राहिलेले अशोक मुर्तडक व उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्यातील लढत उत्कंठावर्धक होणार आहे. दरम्यान, मुर्तडक यांना भाजपने उमेदवारी नाकारत बग्गांवर विश्वास दाखवत त्यांना तिकीट दिले. मुर्तडक शिंदेसेनेचे पुरस्कृत उमेदवार असल्याने भाजप विरुद्ध शिंदेसेना असा सामना प्रभाग 5 मध्ये रंगणार आहे.
मुर्तडक यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात अधिकृत प्रवेश केला. त्यांची लढत त्यांच्याच महापौरपदाच्या कार्यकाळात उपमहापौर राहिलेले गुरमित बग्गा यांच्याशी होत आहे. बग्गा पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते होते. चार वेळा थेट जनतेतून निवडून आले, तर एकदा स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बग्गा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना उमेदवारी देण्यात आमदार राहुल ढिकलेंची शिष्टाई असल्याचे बोलले जात आहे. माजी महापौर अशोक मुर्तडक पूर्वाश्रमीचे एकसंघ शिवसेनेचे पदाधिकारी होते. मखमलाबाद नाका, क्रांतीनगर भागातून त्यांनी पाच वेळा नेतृत्व केले आहे. एकसंघ शिवसेनेकडून चार वेळा नगरसेवक राहिले आहेत. त्यानंतर मनसेत प्रवेश केला. मनसेच्या सत्ताकाळात 2015 मध्ये मुर्तडक महापौर बनले. मनसेच्या प्रदेश सरचिटणीस पदावर असताना त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहा महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रभाग सहाऐवजी त्यांना प्रभाग पाचमधून निवडणूक लढवायची होती. भाजपने ऐनवेळी त्यांची उमेदवारी कापल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी केली.
सन 2015 मध्ये मनसेच्या सत्ताकाळात मुर्तडक महापौर, तर बग्गा उपमहापौर राहिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, दोघांची ही सहावी निवडणूक आहे.
City’s attention on former mayor-deputy mayor fight
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…