नाशिक

‘दत्तक नाशिक’वरून ठाकरे बंधूंची मुख्यमंत्र्यांवर टीका

शहराची बकाल अवस्था, नाशकात शिवशक्तीची विराट सभा

नाशिक : प्रतिनिधी
भाजपमध्ये निष्ठावंतांना किंमत नसून भाडोत्री लोक आणले जात आहेत. नाशिककर 2017 मध्ये भूलथापांना बळी पडले. मात्र, दत्तक शहरात ड्रग्ज, बकालपणा व भ्रष्टाचारच पोसला गेला. तपोवनातील झाडे तोडून जमीन बिल्डरच्या घशात घातली जाणार आहे, अशी जहरी टीका ठाकरे बंधूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर येथे शुक्रवारी (दि. 9) केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त सभा शुक्रवारी (दि. 9) ऐतिहासिक अनंत कान्हेरे (गोल्फ क्लब) मैदानावर पार पडली. यावेळी उद्धव व राज यांनी खास आपल्या शैलीत भाजपचा समाचार घेतला. यावेळी खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, उपनेते दत्ता गायकवाड, खासदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार वसंत गिते, जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, मनसेचे अंकुश पवार, सुदाम कोंबडे आदींसह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

भाजप-एमआयएम युती हे कोणते हिंदुत्व?

भाजपने पाठीत खंजीर खुपसला म्हणून आम्ही कॉँग्रेससोबत गेलो. त्यावरून आम्ही हिंदुत्व सोडल्याची टीका भाजप करतो. मात्र, हाच भाजप जेव्हा अकोटमध्ये एमआयएमशी सत्तेसाठी युती करतो, तेव्हा आम्हाला हिंदुत्व शिकवणार्‍या भाजपचे हे कोणते हिंदुत्व आहे, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.

अपूर्ण प्रकल्पांची वाचली यादी

दत्तक नाशिक घेताना मुख्यमंत्र्यांनी खूप घोषणा केल्या. त्यात निओे मेट्रो, आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क, द्वारका उड्डाणपूल, बाह्य रिंगरोड, नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे हे सर्व प्रकल्प झाले का, याची विचारणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून विचारली असता, त्यावर उपस्थितांकडून नाही, नाही असे म्हणत प्रकल्प झाले नसल्याचे राज ठाकरे यांनी निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

15 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

15 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

15 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

15 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

15 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

16 hours ago