नगराध्यक्षा पाटील यांची संकल्पना; लोकसहभागातून उपक्रम
सटाणा : तालुका प्रतिनिधी
शहर स्वच्छ, सुंदर व सुरक्षित करण्याच्या उद्देशाने सटाणा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याच स्वखर्चाने व नगरसेवक, नागरिकांच्या लोकसहभागातून सटाण्याची अक्षगंगा म्हणून ओळखल्या जाणार्या आरम नदीपात्रात स्वच्छतेची मोहीम राबवली.
श्रीदेवमामलेदार मंदिराच्या मागील बाजूस या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. ही मोहीम शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने राबविण्यात आली. नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत चार जेसीबी मशिन, अनेक ट्रॅक्टर व चालकांसह यंत्रसामग्री मोहिमेत सहभागी झाले. नदीपात्रातील काटेरी झुडपे, प्लास्टिक बाटल्या, पिशव्या, तसेच पर्यावरणाला हानी पोहोचवणारा कचरा मोठ्या प्रमाणावर काढून स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत शिवसेना व श्रीदेवमामलेदार गटाचे नगरसेवक, कार्यकर्ते, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांनी, शहराचा भूजलसाठा वाढावा यासाठी जलतज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार नदीचे पात्र नांगरून भुसभुशीत करण्यात आल्याचे स्पष्ट केले. स्वच्छता मोहिमेत मळगाव बंधार्यापासून पुढे श्रीदेवमामलेदार व महालक्ष्मी मंदिराच्या मागील परिसरातून, अमरधाम परिसर तसेच राजमाता जिजाऊ उद्यानालगतच्या नदीपात्रापर्यंत मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करण्यात आली.
दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री भुसे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मोहिमेची दखल घेत नगराध्यक्ष पाटील व उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशात भगव्या रंगाचे फुगे सोडण्यात आले. मोहिमेत शिवसेना गटनेते राहुल पाटील, अॅड. मनीषा पवार, पाणीपुरवठा सभापती भूषण सोनवणे, महिला व बालकल्याण सभापती कल्पना सोनवणे, उपसभापती तनुजा नांद्रे, नगरसेवक जयश्री गरुड, मंगेश खैरनार, अॅड. हुमेरा शेख, अलका बोरसे, डॉ. जतीन कापडणीस, शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष नंदन, अरविंद सोनवणे, अरुण सोनवणे, शिवसेना शहरप्रमुख सुनील पाटील, वंदना भामरे, जे.डी. पवार, विशाल आंबेकर, अनिल सोनवणे, दीपक जपानी, किरण नांद्रे, सागर सोनवणे, डॉ. सुमित गुंजाळ आदींसह कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी व नागरिक सहभागी झाले होते.
Cleanliness campaign in the Aram riverbed of Satana
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…