महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली अपघातस्थळाची पाहणी

 

पोलीस अधिकाऱ्यांकडून जाणून  घेतली माहिती

नाशिक : प्रतिनिधी

शनिवारी पहाटे पाच-साडे पाच वाजण्याच्या सुमारास खासगी लक्झरी बस आणि कोळशाने भरलेल्या ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेनंतर डिझेल टँक फुटून बसने पेट घेतला. यानंतर लागलेल्या आगीत अनेक प्रवासी होरपळले. त्यातील 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अपघातात 32 प्रवासी जखमी झाले.. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच
मुख्यमंत्र्यांनी अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातलगांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दुपारी 1 वाजता नाशिकमध्ये अपघातस्थळी जाऊन आगीत कोळसा झालेली बसची त्यांनी पाहणी केली.
यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. पोलिसांनी अपघातानंतर केलेल्या पंचनाम्यातून काय माहिती समोर आली आहे, हे त्यांनी जाणून घेतलं
काही पोलीस अधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपघाताची माहिती देताना दिसून आले. दरम्यान, या अपघातानंतर करण्यात आलेल्या पाहणीवेळी पालकमंत्री दादा भुसे, आणि मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, सुहास कांदे हे देखील उपस्थित होते.स्थानिक प्रशासकीय यंत्रणा, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वर्गासोबत एकनाथ शिंदे यांनी यावेळी अपघात झाले्लया ठिकाणाची पाहणी केली. अपघातानंतर बसला आग लागल्यामुळे मोठी दुर्घटना घडली होती. या आगीत 12 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.. पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी प्रवाशांचीही भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी जखमी प्रवाशांची विचारपूस केली. स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णायलातही जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. जखमींना बरं करण्यासाठी कोणत्याही गोष्टींची कमतरता पडू नये, याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. डॉक्टरांच्या पथकासोबतही त्यांनी यावेळी संवाद साधला. राज्य शासनाकडून पाच तर पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. जखमींना 50 हजार रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचं म्हटलंय.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago