वर्षा निवासस्थान सोडताना मुख्यमंत्री भावुक

 

मुंबई : ज्यांना जायचं आहे त्यांनी जा … असं भावनिक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले . वर्षावरून मातोश्रीकडे जाताना उद्धव ठाकरे असे बोलले आणि निघून गेले . उद्धव ठाकरे यावेळी भावुक झाल्याचे दिसून आले . त्यामुळे शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या संघर्षाला आता भावनिक रूप आल्याचं पाहायला मिळतंय . तिकडून काय सांगता तोंडावर सांगा , मी राजीनामा द्यायला तयार आहे , असे उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून म्हटले होते . जनतेशी तसेच बंडखोर आमदारांशी संवाद साधला . तुम्ही इकडे या आणि मला सांगा , मुख्यमंत्रिपदासाठी तुम्ही लायक नाही , मी लगेच राजीनामा देतो , असं उद्धव ठाकरे म्हणाले . त्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला वर्षा बंगला आजच सोडणार असल्याचं जाहीर केलं . त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान सोडले . वर्षा निवासस्थान सोडताना त्यांनी एकच वाक्य उच्चारलं , ज्यांना जायचं आहे त्यांनी जा … असे म्हणाले आणि निघून गेले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *