शहरात कोम्बिंग ऑपरेशन १२६ टवाळखोरांवर कारवाई
नाशिक : वार्ताहर
गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ १ च्या वतीने सोमवारी ( दि . २० ) रोजी पंचवटी , आडगाव , म्हसरूळ , सरकारवाडा , गंगापूर व मुंबई नाका आदी पोलीस ठाणेनिहाय सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे . यावेळी १२६ संशयितांविरोधात कारवाई करण्यात आली .
पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे पोलीस आयुक्त , नाशिक शहर यांचे आदेशाने ही मोहीम पोलीस यांनी उपायुक्त परिमंडळ १ चे अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली . सर्व पोलीस ठाणे हद्दीत स्वतंत्र पथकाने विशेष मोहीम राबवून धडक कारवाई करण्यात येत आहे . विशेष पथक तयार करून प्रत्येक पथकात १
पोलीस अधिकारी , ५ पुरुष पोलीस अंमलदार , २ महिला पोलीस अंमलदार आदींनी शनिवार दि . १८ जून रोजी मध्यरात्री मोहिमेत सहभागी करण्यात आले होते . कार्यालयीन कामकाज पाहणाऱ्या अंमलदारांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला होता . परिमंडळ १ कार्यक्षेत्रातील ७ पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत १३८ संशयितांवर कारवाई करण्यात आली . सदर मोहिमेत जास्तीत जास्त पोलीस अधिकारी व अंमलदारांचा समावेश करण्यात आला आहे . पंचवटी १४ , आडगाव २२ , म्हसरूळ २१ ,
भद्रकाली १२ , सरकारवाडा ११ , गंगापूर १ ९ , मुंबई नाका २७ एकूण १२६ संशयितांविरोधात कारवाई करण्यात आली . संशयितांविरोधात नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे .
नाशिकरोड : वार्ताहर युरेथ्रल स्ट्रिक्चर अत्याधुनिक पद्धतीने शस्रक्रिया कक्षींन आता सुरळीत करता येते. वारंवार यूरेथ्रा…
नाशिकरोड : वार्ताहर जैन धर्माचे 24 वे तीर्थंकार भगवान महावीर यांचा 2624 जन्मकल्याणक म्हणजे जन्मदिन…
चिमण्यांसाठी केली दाणापाण्याची सोय, शहा येथील भैरवनाथ विद्यालयाचा पर्यावरणस्नेही उपक्रम सन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील शहा…
पोलीस ठाण्यातच दोन पोलीस एकमेकांना भिडले नेमके काय कारण घडले? सिडको : विशेष प्रतिनिधी सरकार…
लासलगाव बाजार समितीच्या सभापतिपदी या नेत्याची निवड राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाचे…
अमेरिकेचा मोठा शत्रू अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुमारे ७५ देशांवर लादलेल्या जबर आयात शुल्कामुळे…