‘महावितरण’च्या पोलबाबत तक्रार करूनही दुर्लक्ष

दुर्घटना घडल्यावर जाग येणार का? मयुरी सानप यांचा सवाल

पंचवटी : प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक सहामधील शांतीनगर भागातील स्वामी समर्थ केंद्राजवळील मेतकर हॉस्पिटल शेजारील विद्युत रोहित्र (डीपी) व विद्युत पोलला झुडपांनी विळखा घातला असून, पोलदेखील दिसेनासा झाला असून, या ठिकाणी दुर्घटना घडल्यानंतर महावितरण विभागाला जाग येणार आहे का, असा सवाल परिसरातील महिला मयुरी सानप यांनी केला आहे.
शांती नगर भागातील स्वामी समर्थ केंद्राजवळील मेतकर हॉस्पिटल शेजारील विद्युत रोहित्र (डीपी) व विद्युत पोलच्या दुरवस्थेबाबत महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना जागेवर बोलवून निदर्शनास आणून दिली. या ठिकाणी झुडपांमुळे विद्युत पोल पूर्ण झाकला गेला आहे. या लाइनची देखभाल करून झुडपे स्वच्छ करण्यास सांगितले.
तसेच हा रस्ता रहदारीचा असून, या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने येथील डीपी व पोल रस्त्यात येत असल्याने रहदारीचा तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे डीपीला संरक्षक जाळी लावण्याची अथवा इतरत्र हलवण्याची मागणी केली. तर हे काम लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे, जेणेकरून काही अनुचित घटना घडणार नाही.

Complaint regarding ‘Mahavitaran’ pole ignored despite being lodged.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *