नाशिक : प्रतिनिधी
सिन्नरचे ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ वाजे यांच्या पत्नी आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मातोश्री रोहिनीताई वाजे (81) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी संगमनेर नाका येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. निधनाचे वृत्त समजताच वाजे यांच्या सांत्वना साठी सिन्नर येथील निवासस्थानी गर्दी झाली आहे. त्यांच्या पश्चात पती प्रकाश वाजे, चि. राजाभाऊ वाजे, सून, नातवंडेअसा परिवार आहे.