घरगुती पुरवठा सुरळीत, उद्योग क्षेत्रात चिंता
नाशिक : प्रतिनिधी
शहरात गॅस सिलिंडरच्या अचानक वाढलेल्या मागणीमुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
इराण-इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सिलिंडर बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काही ठिकाणी गॅस एजन्सी कार्यालयांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. जिल्हाधिकार्यांनी गॅस पुरवठा करणार्या कंपन्यांच्या अधिकार्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शासनाच्या 9 मार्चच्या आदेशानुसार गॅस वितरणासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला असून, सर्वप्रथम घरगुती वापरासाठी, त्यानंतर अत्यावश्यक सेवांसाठी आणि शेवटी व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रासाठी गॅस पुरवठा केला जाणार आहे.
घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून, वितरणही नियमित सुरू असल्याचे आयुष प्रसाद यांनी सांगितले. घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर पथके नियुक्त करण्यात आली असून, हॉटेल किंवा इतर ठिकाणी घरगुती सिलिंडरचा गैरवापर आढळल्यास नागरिकांनी तहसीलदारांकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Confusion due to increased gas demand
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…