नाशिक

नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकाची सव्वा कोटीची फसवणूक

भोंदूबाबा अरुण पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल

देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
बनावट साठेखत, अधिकारपत्र आणि गोड बोलून विश्वास संपादन करत एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाची तब्बल 1 कोटी 23 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कथित भोंदूबाबा अरुण धोंडू पाटील याच्याविरुद्ध देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी अतिश महेंद्र शहा (रा. राका कॉलनी, नाशिक) हे देवळाली कॅम्प परिसरातील बांधकाम व्यावसायिक आहेत. संशयित आरोपी अरुण पाटील (रा. तानाजी निवास, गंगापूर, नाशिक) याने शहा यांच्याशी जवळीक निर्माण करून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विहितगाव शिवारातील सर्व्हे क्रमांक 51/2 मधील 184 आर क्षेत्राचे मूळ साठेखत असल्याचे दाखवून त्यांना व्यवहारासाठी प्रवृत्त केले. तसेच सर्व्हे क्रमांक 541, 40/2/अ, 40/2/ब आणि 40/2/क या मिळकतींच्या मूळ मालक पंडित बळवंत बोराडे व इतरांच्या नावाने बनावट साठेखत आणि अधिकारपत्र तयार केले. ही कागदपत्रे खरी असल्याचे भासवून आरोपीने शहा यांचा विश्वास संपादन केला.
या तक्रारीवरून देवळाली कॅम्प पोलिसांनी अरुण पाटील याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक पाडेकर पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणात आरोपीने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, तसेच बनावट कागदपत्रांच्या व्यवहारात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, देवळाली कॅम्प परिसरातील जमीन व्यवहारांमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर होत असल्याच्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Construction developer in Nashik defrauded of 1.25 crore rupees

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बदनामीची धमकी देत महिलेवर वारंवार अत्याचार

अल्पवयीन मुलीचाही विनयभंग; गुन्हा दाखल नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी पैसे परत देण्याच्या बहाण्याने महिलेला लॉजवर…

11 minutes ago

बाराशे क्रेट्स पेरूंसह 13 लाखांचा ट्रक गायब

चालकावर गुन्हा दाखल; पिंपळगाव बसवंत पोलिसांत तक्रार निफाड : तालुका प्रतिनिधी पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न…

25 minutes ago

कृतघ्न मुलांना धडा शिकवायलाच हवा!

आपल्या बाळाच्या पालनपोषणात, शिक्षणात, आवडीनिवडी जपण्यात कोणतीही उणीव राहू नये, यासाठी आई-वडील आयुष्यभर राबत असतात.…

36 minutes ago

पुराना रिश्ता नया दौर

भाजपाचा सर्वांत जुना मित्रपक्ष कोणता असेल, तर तो पंजाबमधील शिरोमणी अकाली दल. या पक्षाशी असलेली…

41 minutes ago

सिंहस्थानंतरही 15 ते 20 वर्षे विकासकामांचा लाभ : शेखर सिंह

मार्चअखेर सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले होणार नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा…

49 minutes ago

गोदाघाट परिसरातील पार्किंग जमीनदोस्त

मलवाहिकांच्या वाहिन्यांसाठी निर्णय नाशिक : प्रतिनिधी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील जुन्या व जीर्ण झालेल्या…

56 minutes ago