मोहदरी घाटात कंटेनर उलटला; नाशिक-पुणे महामार्ग ठप्प!

समोरील टायर फुटल्याने अपघात

सिन्नर : प्रतिनिधी
नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी साडेसातच्या सुमारास कंटेनर उलटल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. पुण्याहून नाशिककडे येणार्‍या महिंद्रा कंपनीच्या कंटेनरचा समोरील टायर अचानक
फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कंटेनर रस्त्यावर उलटला. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सुमारे एक ते दीड तास वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही.
महिंद्रा कंपनीचा कंटेनर (एमएच 04 एमआर 5019) पुण्याहून नाशिकच्या दिशेने जात होता. मोहदरी घाटात आला असता कंटेनरचा समोरील टायर अचानक फुटला. त्यामुळे चालक नरसिंग यादव यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर रस्त्यावर उलटला. अपघातात कंटेनरचे नुकसान झाले; मात्र चालक सुखरूप बचावला.
कंटेनर रस्त्यावर उलटल्याने महामार्गावरील वाहतुकीचा मार्ग अडला. परिणामी, दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. सकाळच्या वेळेत प्रवास करणार्‍या वाहनचालकांसह प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सुमारे एक ते दीड तास वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली.

महामार्ग पोलिसांकडून वाहतूक सुरळीत

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रवीण गुंजाळ, महेश गवळी, तृप्ती पवार, संदीप खैरनार आणि गजानन गोटमवाड यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. पोलिसांच्या प्रयत्नांनंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. सुदैवाने अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

 

Container truck overturns in Mohadari Ghat; Nashik-Pune highway brought to a standstill!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *