नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम संथ झाली आहे . देशभरात तिला चांगलीच गती देण्याची गरज आहे . त्यामुळे केंद्राने सर्व राज्यांना जूनपासून ‘ हर घर दस्तक मोहीम २ ‘ दोन महिने राबवण्याची सूचना केली आहे . आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना आवाहन केले आहे की , देशभरात संपूर्ण लसीकरणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी मोहिमेची गती वाढवण्याची गरज आहे . राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींसह झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ही सूचना केल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने एका पत्रकाद्वारे दिली . पत्रकात नमूद केले आहे , की ‘ हर घर दस्तक ‘ योजनेचा दुसरा टप्पा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी राबवावा . येत्या जून व जुलैत सर्व जिल्हे , गाव पातळीवर सर्वत्र ही योजना अंमलात आणावी .
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…
शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…
नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…
दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक दिंडोरी : प्रतिनिधी शहरातील आश्रय लॉज च्या…
नाशिक: प्रतिनिधी महापालिका आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय रजेवर गेल्यानंतर त्यांच्या जागी वर्धा येथील जिल्हाधिकारी…
बराजकमल एंटरटेनमेंट'ची दमदार घोषणा महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनित नवा मराठी चित्रपट…