महाराष्ट्र

कोविड – खरं काय, खोटं काय*

*कोविड – खरं काय, खोटं काय*

 

 

बुधवारी झालेल्या चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या अंतर्गत बैठकीच्या मिनिटांनुसार, डिसेंबरच्या पहिल्या २० दिवसांत तब्बल २.४८ कोटी लोक किंवा जवळपास १८% लोकसंख्येला विषाणूची लागण झाली आहे. ही आकडेवारी खरी असल्यास, संसर्ग दर जानेवारी २०२२ मध्ये सेट केलेल्या सुमारे ४० लाखांचा पूर्वीचा रोजच्या विक्रम मोडेल. एका अहवालानुसार, चीनमध्ये २० डिसेंबरसाठी रुग्णासंख्येत दररोज ३.७ कोटींची वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतु एक विरोधाभास लक्षात घेण्यासारखा आहे की चीनमधील अधिका-यांनी दिवसभरातील अधिकृत आकडेवारी फक्त ३,०४९ इतकी कमी नोंदवलेली होती. २१ डिसेंबर रोजी २,९६६ नवीन केसेस नोंदल्या गेल्या असून अधिकृत आकडेवारीनुसार डिसेंबरच्या सुरुवातीपासून १० पेक्षा कमी कोविड मृत्यू झाले आहेत. तथापि, रुग्णालये गर्दीने भरलेली आहेत आणि अंत्यविधी व स्मशानभूमि त्यांच्या मर्यादेपेक्षाही जास्त भरले जात असल्याच्या बातम्या एक विरोधाभासी चित्र चित्रित करतात. चीनने व्हायरसच्या आकड्यांचा अहवाल देण्याच्या पद्धतीतही बदल केला आहे. देशाने मास-टेस्टिंग बूथचे मोठे नेटवर्क बंद केले आहे आणि दैनंदिन टॅलीमध्ये प्रत्येक संसर्ग मोजणे बंद केले आहेत. यामुळे रहिवासी जलद चाचण्यांवर विसंबून राहतात आणि सरकारला अहवाल देण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. देशाच्या आरोग्य नियामकाने देखील कोविड मृत्यू मानल्या जाणार्‍या व्याख्येमध्ये बदल केला आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, चीनमध्ये या आठवड्यात एकाच दिवसात सुमारे ३.७ कोटी कोविड पॉझिटिव्ह केसेसची नोंद केली गेली आहे. हे अंदाज सरकारच्या अधिकृत आरोग्य प्राधिकरणाचे आहेत. चीनचा उद्रेक हा जगातील सर्वात मोठा उद्रेक म्हणून ओळखला जात आहे. या दोन वेगवेगळ्या आणि विरोधाभासी बातम्या आज प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित होत आहे. खरं काय खोटं काय , देव जाणो. परंतु, आपल्याला तर वास्तवात जगायच आहे, वस्तुस्थिती माहीत असावी आणि त्याप्रमाणे आपण आपल्या संरक्षणाचे उपायोजना आखू शकतो. चीनमध्ये कोविडचा स्फोट झाला आहे, असे जारी मान्य केलं, त्री आपल्यात आणि त्यांच्यात खूप मोठा फरक आहे. आपली स्थिति चीनच्या स्थितीपेक्षा वेगळी आहे. चला, वास्तव काय आहे आणि भविष्यात आपल्या ताटात काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज घेऊया.
आज भारतातील सक्रिय कोविड केसेसचा लोड ३,३९७ आहे, जे आजवरच्या एकूण केसेसच्या 0.01 टक्के आहे. बरे होण्याचा दर सध्या 98.8 टक्के आहे. गेल्या 24 तासात तब्बल 183 रुग्ण बरे झाले असल्यामुळे बरे झालेले एकूण रुग्णांची संख्या ४,४१,४२,७९ वर पोहोचली आहे. पॉझिटिव्ह टेस्ट चा रोजचा दर ०.१५% आहे, तर साप्ताहिक दर ०.१४% आहे. कोविड-१९ लसीकरणाच्या आघाडीवर, सरकारी आकडेवारीनुसार, देशात आजवर कोविड-१९ लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत २२०.०४ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशभरात कोविड-१९ लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि गती वाढवण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहे. भारतात कोविड-१९ लसीकरण १६ जानेवारी २०२१ रोजी सुरू झाले होते व लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाचा नवीन टप्पा २१ जून २०२१ रोजी सुरू झाला. ९०% पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झालेले आहे आणि ५०% लोकांचे बूस्टर डोस देखील घेऊन झालेले आहे. लसीकरणामुळे शरीरात कोविद विरोधी कृत्रिम प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे. तसेच ज्या साडेचार कोटी लोकांना कोविद झाला होता आणि आहे, त्यांच्या शरीरात नैसर्गिक प्रतिकारशक्ति तयार झालेली आहे. एकंदर काय टीआर, बहुतांश लोकांच्या शरीरात कोविद विरोधी अॅंटीबॉडी आहेत. आता कोविड सदृश अथवा कोविद्संबंधित कुठलाही व्हायरस आला त्री भारतीयांचे शरीर त्याला काहीतरी प्रमाणात प्रतिबंध / प्रतिकार करणारच. त्यामुळे ओमीक्रोन BF.7 या स्ट्रेनचा आपल्यावर फारसा प्रभाव होणार नाही, असा माझा अंदाज आहे.
सरकारने कोविड प्रतिबंध लावण्याची शक्यताच अधिक आहे.. परंतु, मास्क वापरणे, सेनीटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करु शकते. फारतर, जमाव बंदी लागू शकते. लोक-डाउन लाडण्याची शक्यता मला खूप कमी वाटते. आणि तेही रास्तच आहे. कारण आत आगेल्या सहा एक महिन्यांपासून लोकांच्या जीवनाची गाडी हळू हळू का असेना, परंतु रुळावर यायला सुरवात झाली आहे. गणपती, नवरात्र, दिवाळी, लग्न सोहळे बंद असल्याने मंद झालेली बाजारपेठ आता कुठे तरी खुलायला लागलेली आहे. उद्योग धंद्यांनी जम बसवायला सुरू केले आहे. लोकांचे रोजगार सुरू झाले आहे. कोलमडलेल्या आर्थिक बुरूजांची डागडुजी करून जीवनाचा गाडा ओढण्याचे काम सुरू झाले आहे. कोविड विस्मरणात गेला आहे असं वाटत असतांनाच अशा आशयाच्या बातम्या थडकल्याने अनेकांच्या हृदयाच्या धडकणी वाढल्या असणार आहे. नेमके काय होणार आहे, याची कल्पना केली तरी आर्थिक, शारीरिक, मानसिक, भावनिक आणि मनुष्य हानी होणार, असे वाटू लागले आहे.
माझी आपल्याला विनंती आहे की, आता कोविडला घाबरणे बंद करा. त्याला जे नुकसान करायचे होते, ते करून झाले आहे. त्याला आपल्याला जो धडा शिकवायचा होता तो शिकवून झाला आहे. आपली स्थिति भक्कम आहे. बाहेरच्या बातम्यानवर फार विसंबून राहू नका. खरं खोटं आपल्याला माहीत नाही. जे आपल्या हातात आहे, तेव्हढच करूया. शरीर तंदुरुस्त ठेवा, मन शांत ठेवा. सकस आणि संतुलित आहार घ्या. प्रोटिंस चे प्रमाण वाढवा, वजन कमी करा. योगा, प्राणायम करा. नियमित व्यायाम देखील गरजेचा आहे. स्वताहला व्यस्त ठेवा. आवडीच्या गोष्टी करा. कुटुंबियांसोबत वेळ घालवा. फिरायला जा, सहलीला जा, ट्रेकिंग करा. नाताळ आणि नववर्षं साजरा करा. मौज मस्ती करा, परंतु व्यसन बंद करा. उद्याची चिंता सोडा, आज, आत्ता जगायला शिका. खुश रहा, आनंदी रहा, समाधानी रहा. जे आहे त्यात तृप्त असा. जे मिळालेले आहे, आणि जे आत्ता आहे, त्याबद्दल कृतज्ञ रहा. निसर्ग आपले कारी केआरटी आहे, तुम्ही तुमचे कार्य करा, कर्म करा. यातच जीवनाचा खरा अर्थ दडला आहे. Be Alert, Be Safe. Take care.

*डॉ. संजय धुर्जड.*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732

Devyani Sonar

View Comments

Recent Posts

एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास

एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…

21 hours ago

सर्प विज्ञानाची गरज

ह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा:। नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा॥ ब्रह्मलोकामधील सर्व सर्पांचा राजा नागदेव…

22 hours ago

आकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजली

यंदा राख्यांना महागाईची वीण नाशिक : प्रतिनिधी बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण दहा…

22 hours ago

तुजवीण शंभो मज कोण तारी!

पहिल्याच श्रावणी सोमवारी शिवालये गर्दीने फुलली नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी महादेव मंदिरांत…

23 hours ago

पाथर्डीत वर्षभरात एकाच रस्त्याचे चार वेळा काम

महापालिकेच्या कामाचे पितळ उघडे; नागरिकांत नाराजी इंदिरानगर : वार्ताहर पाथर्डी फाटा प्रभाग क्रमांक 31 मधील…

23 hours ago

माणिकराव कोकाटे अजित दादांच्या भेटीला

मुंबई: विधानसभेत रमी खेळत असल्याच्या मुद्द्यावरून जोरदार टीका झाल्यामुळे चर्चेत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे…

1 day ago