नाशिक

रेल्वे खानपान विक्रेत्यांना चाप; सात लाखांवर दंड

भुसावळ विभागाची आकस्मिक तपासणी; अधिक दर आकारणार्‍यांवर कारवाई

लासलगाव : वार्ताहर
रेल्वेस्थानकांवर प्रवाशांना निर्धारित दरात दर्जेदार खाद्यपदार्थ व पेये उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने खानपान स्टॉल, ट्रॉली विक्रेते तसेच अधिकृत विक्रेत्यांची नियमित आकस्मिक तपासणी सुरू केली आहे. निर्धारित कमाल किरकोळ किमतीपेक्षा अधिक दर आकारणे अथवा अन्य व्यावसायिक अनियमितता करणार्‍या विक्रेत्यांवर रेल्वे प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जात आहे.
प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ तसेच पेयांसाठी एमआरपीपेक्षा जास्त रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी रेल्वे मदतच्या माध्यमातून प्राप्त होत असतात. या तक्रारींची दखल घेत तसेच प्रवाशांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाकडून विविध रेल्वे स्थानकांवर अचानक तपासण्या करण्यात येत आहेत.
तपासणीदरम्यान विक्रेता निर्धारित दरापेक्षा अधिक रक्कम आकारताना किंवा अन्य व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास, संबंधिताविरुद्ध रेल्वेच्या प्रचलित नियमांनुसार तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येते. आर्थिक दंडासोबतच प्रकरणाच्या स्वरूपानुसार इतर शिस्तभंगाची कारवाईही केली जाते. एप्रिल ते जुलै 2026 या चार महिन्यांच्या कालावधीत भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाने अशा व्यावसायिक अनियमिततांविरोधात केलेल्या कारवाईत संबंधित विक्रेत्यांकडून एकूण 7 लाख 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवरील खानपान विक्रेत्यांमध्ये नियमांचे पालन करण्याबाबत प्रशासनाचा धाक निर्माण झाला आहे. प्रवाशांना योग्य दरात वस्तू व सेवा मिळाव्यात, त्यांच्या ग्राहक अधिकारांचे संरक्षण व्हावे आणि रेल्वे स्थानकांवरील खानपान सेवेतील पारदर्शकता कायम राहावी, यासाठी तपासणी प्रक्रिया सातत्याने सुरू ठेवण्यात
येणार आहे.

प्रवाशांनी तक्रार नोंदवावी

रेल्वेस्थानकावर किंवा रेल्वेगाडीत कोणत्याही खाद्यपदार्थ अथवा पेयासाठी निर्धारित दरापेक्षा अधिक रक्कम आकारली जात असल्यास प्रवाशांनी त्याकडे दुर्लक्ष न करता रेल्वे मदतच्या माध्यमातून तातडीने तक्रार नोंदवावी, असे आवाहन मध्य रेल्वे, भुसावळ विभागाकडून करण्यात आले आहे. तक्रारीच्या आधारे संबंधित विक्रेत्याची चौकशी करून नियमांनुसार कारवाई करणे शक्य होणार आहे.

 

Crackdown on railway catering vendors; fines exceeding ₹7 lakh imposed.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

16 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

16 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

16 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

17 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

17 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

17 hours ago