गुन्हेशाखा युनिट क्र. 1 ची कारवाई
सिडको : विशेष प्रतिनिधी
नांदूर नाका येथील महापालिकेच्या गार्डनमध्ये पावभाजी खात असताना फिर्यादीस प्रकाश विसपुते ऊर्फ पक्या खटकी याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीमुळे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या फिर्यादीवरून आडगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी गुन्हे शाखेने पथक तयार करून संशयिताच्या शोधादरम्यान तो बटुक हनुमान मंदिराकडे जाणार्या रस्त्यावर सापडला. त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने स्वतःचे नाव प्रकाश राजेंद्र विसपुते ऊर्फ पक्या खटकी (वय 40, रा. आम्रपाली झोपडपट्टी, म्हसोबा मंदिराजवळ, उपनगर, नाशिक) असे सांगितले.
दरम्यान, संशयित प्रकाश विसपुते याच्याविरोधात पुढील कारवाईसाठी त्याला आडगाव पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीवर यापूर्वीही भद्रकाली पोलिस ठाण्यात तीन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच पंचवटी आणि आडगाव पोलिस ठाणे, तसेच विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.
ही संपूर्ण कारवाई गुन्हेशाखा युनिट क्र. 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलिस निरीक्षक हिरामण भोये, पोलिस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, हवालदार प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, प्रदीप म्हसदे, संदीप भांड, योगीराज गायकवाड, विशाल काठे, नाझीमखान पठाण, मिलिंदसिंग परदेशी, पोलिस अंमलदार अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख आणि समाधान पवार यांच्या संयुक्त पथकाने केली.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…