वन विभागाने बंदोबस्त करावा, या मागणीसाठी राजापूरला रास्ता रोको
येवला : प्रतिनिधी
रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकरी हैराण झाले असून, वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा, या मागणीसाठी येवला तालुक्यातील राजापूर येथे शेतकर्यांनी रास्ता रोको आंदोलन करून तीव्र निषेध केला.
दरम्यान, वन विभागाने वनविभागांतर्गत रात्रीची गस्त वाढवण्यात येईल, ज्या शेतकर्यांचे नुकसान झाले, त्यांचे तातडीने पंचनामे करण्यात येऊन नुकसानभरपाई देण्यात येईल, कायमस्वरूपी जाळीचे तार कंपाउंड करण्यात येईल, असे आश्वासन येवला वन विभागाचे वनक्षेत्रपाल राहुल घुगे यांनी दिले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकर्यांची जंगलाशेजारी शेतजमीन असून, रानडुकरांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे.
शेतकर्यांनी पेरणी केलेली असून, रानडुकर शेतात पेरणी केली की लगेचच रात्री उकरून खाऊन टाकत आहे. यामुळे शेतकरीवर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकर्यांना दरवर्षीच पेरणी केली का, पाऊसपाण्यांचा विचार न करता रात्रभर शेतात रानडुकरांचा उपद्रव कमी करण्यासाठी राखण करावे लागते. रानडुकर मोठ्या प्रमाणावर शेतातील पिकांचे नुकसान करतात. या पार्श्वभूमीवर राजापूर चौफुलीवर राजापूर, ममदापूर, सोमठाणजोश व वन विभागाच्या जंगलाशेजारी असलेल्या शेतकर्यांनी दीड ते दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.
येवला तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी चोख बंदोबस्त ठेवला. येवला पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मंडलिक, राजापूर बीट हवालदार दीपक जगताप, पोलिसपाटील मनोज अलगट यांनी आंदोलनस्थळी सहकार्य केले. यावेळी समाधान आव्हाड, अशोक आव्हाड, एकनाथ आव्हाड, अजित आव्हाड, विजय धात्रक, सुभाष वाघ, दत्तात्रय धात्रक, दत्तू वाघ, सयाजी गुडघे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राजापूर, ममदापूर, खरवंडी, देवदरी, सोमठाण जोश आदी गावांतील बहुसंख्य शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
येवला वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे, राजापूर वनपाल भाऊसाहेब माळी, ममदापूर वनरक्षक गोपाल हरगावकर, राजापूर वनरक्षक गोपाल राठोड यांना शेतकर्यांनी निवेदन दिले. वन विभागाच्या जंगलात जाळीचे तार कुंपण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचार्यांनी आंदोलकांना देऊन आंदोलन मागे घेण्यात आले.
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…