विलंब होत असल्याने नाराजी; अतिरिक्त व्यवस्थेची मागणी
देवळा : प्रतिनिधी
येथील कै. शांतारामतात्या आहेर शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात शासनाने जाहीर केलेल्या मका हमीभाव खरेदीसाठी शेतकर्यांना मका विक्रीसाठी नावनोंदणी सुरू करण्यात आली असून, 617 शेतकर्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती संघाचे व्यवस्थापक गोरखनाथ आहेर यांनी दिली.
मक्याला बाजारात अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने शेतकरी मोठा अडचणींत सापडला आहे. शासनाने मक्याला दोन हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल दराने आधारभूत किंमत जाहीर केल्यामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, परंतु शेतकर्यांना आपला मका हमीभावाने विक्री करता यावा, यासाठी तालुक्यातील शेतकरी नावनोंदणी करण्यासाठी शेतकी संघाच्या कार्यालयात मोठी गर्दी करत आहेत. सकाळी शेतकर्यांच्या नावनोंदणीसाठी रांगा लागत आहेत. महिला शेतकरी यात सहभागी झाल्या आहेत, परंतु ऑनलाइन नावनोंदणी प्रक्रियेत येणार्या अडचणीमुळे दिवसभरात 50 ते 60 शेतकर्यांचीच नावनोंदणी होत असल्याने शेतकर्यांमध्ये मोठी नाराजी वाढू लागली आहे.
शेतकरी नावनोंदणी करत आहेत, परंतु इंटरनेट सर्व्हर वारंवार डाउन होत असल्याने तासन्तास प्रतीक्षा करूनही नोंदणी न होण्याची वेळ शेतकर्यांवर येत आहे. तालुक्यातील शेतकरी अद्याप नावनोंदणीच्या प्रतीक्षेत असून, मका विक्री पेमेंट थेट शेतकर्यांच्या राष्ट्रीयीकृत बँक खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे कोणतेही रोख पेमेंट होणार नसल्याचे संघाने स्पष्ट केले आहे. नावनोंदणीची अंतिम तारीख 15 डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र असलेल्या शेतकर्यांनी नावनोंदणीसाठी उशीर न करता आवश्यक कागदपत्रांसह नाव नोंदणी करावी, असे आवाहन संघाचे चेअरमन संजय गायकवाड, व्हा. चेअरमन रवींद्र जाधव व संचालक मंडळाने केले आहे.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
शेतकर्यांच्या नावावरील सातबारा उतारा, सातबारा सामाईक असल्यास इतर खातेदारांची संमती आवश्यक, आधार कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक तपशील, सन 2025-26 मधील सातबारा उतार्यावर मका पीक लागवड आवश्यक असावी, नावनोंदणीवेळी शेतकरी स्वत: उपस्थित असणे बंधनकारक.
मका नावनोंदणीसाठी शेतकर्यांची गर्दी वाढत आहे. मका नोंदणीसाठी 15 डिसेंबरपर्यंत सर्व पात्र शेतकर्यांची नोंदणी पूर्ण व्हावी यासाठी अतिरिक्त यंत्रणा उपलब्ध करून द्यावी.
-संजय भदाणे, सचिव, देवळा तालुका ग्राहक पंचायत
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…