घोटी स्टेट बँकेच्या समोर ग्राहकांची तोबा गर्दी

 

धामनगाव :सुनील गाढवे
इगतपुरी तालुक्याची महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या घोटी स्टेट बँकेत तालुक्यातील हजारो ग्राहकांचे खाते असून व्यापारी,पेन्शनर्स,नोरदार शेतकरी,सेविंग खाते बचत खाते व चालू खाते ,शैक्षणिक कर्ज ,पिक कर्ज, वाहन कर्ज रक्कम काढणे, टाकणे ह्या विविध कामानिमित्त बँकेत वयोवृद्ध ग्राहकांना दूरधरून पंचवीस तीस किलोमीटर वरून यावे लागते परंतु या स्टेट बँकेला आजपर्यंत ग्राहकांच्या बाबतीत कधीही कळवळा निर्माण झालेला नाही, त्यात महत्त्वाचे म्हणजे बँकेचे स्थलांतर मोकळ्या जागेत होणे गरजेचे आहे बँकेचा कारभार बघता त्यात आत मध्ये ग्राहकांची गर्दी, बैंकेत ग्राहकांना जागा देखील होत नसल्यामुळे बाहेर सिक्युरिटी गार्ड तासंतास प्रतीक्षा केल्यानंतर ग्राहकाला सोडले जाते त्यामुळे रस्त्यावर गर्दी होत असते बाहेरच पासबुक प्रिंट करणे,तेथेच एटीएम त्यामुळेच गर्दीच गर्दी होत असते. एटीम बंद असेल तर आत मध्ये स्वॅप मशीन ठेवून त्यावर कार्ड स्वॅप करणे मग एटीएम सुविधा असली काय आणि नसली काय? त्याचा काय उपयोग तरी काय ?
स्टेट बँकेने वरिष्ठ स्तरावर या बँकेच्या अडीअडचणींची सखोल चौकशी करून ग्राहकांना न्याय मिळवून द्यावा असा सर्वसामान्यांचा प्रश्न असून केवायसी साठी तासंतास रांगेत उभे राहावे लागते त्यामुळे बँकेत येतांना ग्राहकांना घरूनच जेवणाचा डबा म्हणजेच शेतकऱ्याच्या भाषेत भाकर बांधून आणावी लागते कारण नंबर कधी लागेल सांगता येत नसल्याने ग्राहा कांच्या मनात बैंकेविषयी निराशा आहे विशेष म्हणजे या सर्व समस्या दूर करायच्या असतील तर बँकेने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे तरच पंचवीस तीस किलोमीटर वरतून येणाऱ्या ग्राहकांना न्याय मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *