नाशिक

संकटांच्या मातीतून फुलवली जिद्दीची द्राक्षबाग

महिला शेतकरी संगीता बोरस्ते यांची प्रेरणादायी यशोगाथा

नाशिक : प्रतिनिधी
पतीच्या अकाली निधनानंतर अंगावर पडलेली चार मुलांची जबाबदारी, शेतीचा कसलाही पूर्वानुभव नसताना समोर उभी ठाकलेली आठ एकराची द्राक्षबाग आणि निसर्गाच्या लहरीपणापासून ते बाजारातील फसवणुकीपर्यंत पावलोपावली झालेला संघर्ष… अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता शेतीत स्वतःला झोकून देणार्‍या साकोरे (ता. निफाड, जि. नाशिक) येथील संगीता अरुण बोरस्ते यांनी संकटांवर मात करत जिद्दीच्या जोरावर निर्यातक्षम द्राक्षशेती फुलवली आहे. संकटांशी दोन हात करत कुटुंबाचा आधारवड बनलेल्या संगीताताईंचा हा प्रवास आज प्रत्येक महिलेला संकटांवर मात करण्याची नवी उमेद देणारा ठरला आहे
सन 2014 मध्ये संगीता बोरस्ते यांच्या पतीचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यावेळी त्यांच्यामागे तीन मुली आणि एक लहान मुलगा असा परिवार होता. पतीच्या जाण्याने डोळ्यासमोर जणू अंधार पसरला होता. घरात आठ एकर द्राक्षबाग होती. मात्र, नेहमीची कामे वगळता बागेच्या व्यवस्थापनाविषयी त्यांना काहीही माहिती नव्हती. अशा वेळी निराश न होता, मुलांचे शिक्षण आणि मुलींच्या लग्नाची जबाबदारी पेलण्यासाठी त्यांनी शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
शेतीचा कोणताही तांत्रिक अनुभव नसल्याने त्यांनी आपल्या पुतण्याचा आणि कृषितज्ज्ञांचा (ग्रोनॉमिस्ट) आधार घेतला. द्राक्षबाग हे अतिसंवेदनशील पीक असल्यामुळे मी पूर्णवेळ या पिकाकडे लक्ष दिले. मुलांचे शिक्षण आणि मुलींची लग्ने करणे ही मोठी जबाबदारी डोळ्यापुढे होती, तसेच मुलगाही लहान होता. मी शेतीत स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन काम केले. त्यामुळे माझी द्राक्षबाग निर्यातीच्या दर्जाची होऊ लागली आणि काही शेतीमाल स्थानिक बाजारातही विकला. द्राक्ष हे अतिशय संवेदनशील पीक असल्याने त्यांनी स्वतःला शेतीत पूर्णपणे झोकून दिले आणि बागेकडे पूर्णवेळ बारकाईने लक्ष पुरवले. त्यांच्या या अथक परिश्रमामुळे बागेतील द्राक्षे आंतरराष्ट्रीय दर्जाची (एक्स्पोर्ट क्वालिटी) होऊ लागली, तसेच काही शेतमालाची विक्री त्यांनी स्थानिक बाजारातही यशस्वीपणे केली. त्यांच्या या जिद्दीची दखल घेऊन त्यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. महिलांनी शेतीत आत्मनिर्भर व्हावे, असा संदेश देतानाच, महिला शेतकर्‍यांना खंबीरपणे उभे राहता यावे यासाठी शासनाने शेतीतील यांत्रिकीकरण आणि खतांवर विशेष सबसिडी द्यावी, अशी रास्त अपेक्षाही त्या व्यक्त करतात.

Cultivated a vineyard of determination from the soil of adversity.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

13 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

13 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

13 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

13 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago