सातपूर : प्रतिनिधी
शहरातील सातपूर परिसरात
गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . या दुर्घटनेत एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे . गॅस गळतीमुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्फोटात अर्चना सिंग या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे . तर आस्था सिंग ही 16 वर्षीय तरुणी जखमी झाली . घटना घडल्यानंतर दोघींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले . मात्र महिलेचा आधीच मृत्यू झाला होता . जखमी तरुणीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे . गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात घरातील सामान खाक झाले आहे .