उत्तर महाराष्ट्र

पालकमंत्री दादा भुसे यांची समयसूचकता; दरोडेखोराला पकडुन केले पोलिसांच्या स्वाधीन

मालेगावातील कलेक्टर पट्टा भागातील घटना

मालेगाव: प्रतिनिधी

मालेगाव बाह्य चे आमदार पालकमंत्री दादा भुसे यांच्या समयसूचकतेमुळे धरोडेखोरांना दरोडा टाकण्याआधीच जेल हवा खावी लागली आहे. यामुळे भुसे यांच्या समयसूचकतेला दाद दिली जात आहे.

मालेगाव शहरातील कलेक्टर पट्टा भागातील दुपारी एका बंगल्यात भर दुपारी दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोराला पकडण्यात यश आले आहे. दुपारच्या सुमारास घरी कुणी नसल्याचा अंदाज बांधत घरी फक्त महिला असतील असे समजत दरोडेखोरांनी लुटीचा डाव साधला.

चोरट्याने बनावट बंदुकीचा धाक दाखवत दागिने व पैशांची मागणी करत महिलेवर धारदार कैचीने तर मुलीस चावा घेतला. या घटनेने हादरलेल्या दोघा मुलींनी घराबाहेर धाव घेउन आरडाओरड करत पळवून लावण्याचा प्रयत्न केला होता, परंतू दरोडेखोराने पळवून न जाता महिलांना बंदुकीचा धाक दाखवत दागिने आणि पैसे काढून देण्याची मागणी केली. याच भागातून जाणारे पालकमंत्री दादा भूसे यांच्या निदर्शनास आली.

त्यांनी तात्काळ बंगल्यात शिरून दरोडेखोराला पकडुन मालेगाव पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. मंत्री दादा भुसे यांच्या समयसूचकतेमुळे दररोडेखोरांना पकडण्यात यश आल्याने भुसे यांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. यातच दुपारी १२ वाजेच्या सुमारास जैन स्थानकाच्या पाठीमागे वसाहतीत घडलेल्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती.

मालेगाव शहरातील ऑटोमोबाईल स्पेअरपार्ट विक्रेते मितेश विनोद दोशी यांचा जैन स्थानकच्या पाठीमागे बंगल्यात दुपारी १२ वाजेच्या सुमारास दुकानातून एक मॅकेनिक बंगल्यावर पोहोचून दरवाजा वाजवला.

मुलीने दरवाजा उघडला असता पप्पांनी पाठवले आहे. असे त्याने सांगितले म्हणुन त्याला घरात प्रवेश देण्यात आला पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावून दागिने व रोकड काढण्यास सांगितले. घरातील सदस्यांनी आरडाओरड करताच परिसरातील रहिवासी बंगल्याकडे धावून आल्याने चोरट्याने पळून जाऊन दरवाजा लावून घेतला.

टेरेसवरून चोरटा खाली येत नसल्याने अग्निशमन दलाचे अधीक्षक संजय पवार यांच्यासह जवानांना पाचारण करण्यात आले होते. बंगल्याच्या बाहेर संतप्त जमाव जमल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत दादा भुसे यांनी शेजारच्या बंगल्याच्या टेरेसवर जाऊन तुला कुणी मारणार नाही, पोलिसांच्या स्वाधीन होऊन जा अशी ग्वाही दिल्याने चोरटा खाली आलात्यास मालेगाव पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. मंत्री दादा भुसे यांच्या समयसूचकतेमुळे दरेडेखोरांना पकडण्यात यश आल्याने भुसे यांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. यातच दुपारी १२ वाजेच्या सुमारास जैन स्थानकाच्या पाठीमागे वसाहतीत घडलेल्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती.मालेगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यात एक चारचाकी वाहन, सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी गेल्या आहेत अशा घटना वारंवार घडत आहे. पकडलेल्या दरोडेखोरास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Bhagwat Udavant

Recent Posts

मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल

  मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…

4 hours ago

ट्रॅपची माहिती होती, तर सतर्क का केले नाही?

मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…

4 hours ago

साप्ताहिक राशिभविष्य

दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…

4 hours ago

महापालिका जिंकायचीय, वाद टाळून कामाला लागा

मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…

4 hours ago

कांदा उत्पादकांवर ओढावणार आर्थिक संकट?

दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…

5 hours ago

नाफेडने जाहीर केले नवे कांदा खरेदी दर

नाफेडने जाहीर केले नवे कांदा खरेदी दर लासलगाव :- समीर पठाण गेल्या महिन्यापासून नाफेडच्या माध्यमातून…

5 hours ago