सर्वतीर्थ टाकेद: शहाबाज शेख
नाशिकचे नूतन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन, महामार्गावर होणारी गुटखा, बनावट दारु, अंमली पदार्थाची अवैध वाहतुक रोखण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. उमप यांना घोटी पोलीस स्टेशनहद्दीतुन अवैधरीत्या गुटख्याची वाहतुक होणार असल्याची गुप्त बातमी मिळाल्याने त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, पोलीस कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. शनिवारी रात्री पासुन घोटी टोलनाका परीसरात नाशिककडून मुंबईकडे जाणारा संशयित कंटेनर क्र. एमएच 12 एसएक्स 9843 याला पकडण्यासाठी सापळा रचला.
रविवारी पावनेतीनच्या सुमाराला वाहनाचा चालक राजु सुभाष पाटील, वय 31, रा. कुडुसगाव, ता. वाडा. जि. पालघर, सध्या राहणार कर्नाटक, सर्फराज फकिर पाशा, वय 32, रा. दुबुलगुडडी, ता. हुन्नाबाद, जि. बिदर, कर्नाटक यांना विचारपुस करुन कसुन चौकशी केली. त्यांनी कंटेनरमध्ये गुटखा असल्याचे कबुल केले आहे. घोटी पोलीस ठाण्यात कंटेनरमधील मालाची शहानिशा करता महाराष्ट्रात वाहतुक व विक्रीला प्रतिबंध असलेला 22 लाख 46 हजार 400 किमतीचा 4 k star सुगंधीत मसाला, तंबाखु ( गुटखा ) त्यात प्रमाणे वाहतुक करणारा कंटेनर किंमत 10 लाख असा एकुण 32 लाख 46 हजर 400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घोटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वाहनचालक राजु सुभाष पाटील, वय 31, रा. कुडुसगाव, ता. वाडा. जि. पालघर, सध्या राहणार कर्नाटक, सर्फराज फकिर पाशा, वय 32, रा. दुबुलगुडडी, ता. हुन्नाबाद, जि. बिदर, कर्नाटक या दोघांना अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी सुरु केला आहे. या कामगिरीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, श्रध्दा गंधास, पोलीस नाईक झाल्टे, कोठुळे, गायकवाड, हवालदार शिंदे, पोलीस नाईक करंडे सहभागी झाले होते.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…