नाशिक

धक्कादायक : वृत्तपत्र विक्रेत्याच्या घरावर दगडफेक ; दुचाकी, चारचाकीचे मोठे नुकसान

नाशिकरोड : प्रतिनिधी
मागील भांडणाची कुरापत काढून नऊ ते दहा जणांच्या टोळक्याने नाशिकरोड येथील वृत्तपत्र विक्रेत्याच्या घरावर तुफान दगडफेक करीत लाखोंचे नुकसान केले ‘यामध्ये घराच्या काचा, दुचाकी आणि चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात वृत्तपत्र विक्रेते अनिल कुलथे यांच्या पत्नी उषा कुलथे (रा. पाटील गॅरेजच्या पाठीमागे, देवळाली गाव नाशिकरोड) यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत माहिती अशी की, शुक्रवारी रात्री कुलथे यांच्या घरावर याच परिसरात राहणाऱ्या  योगेश आव्हाड प्रिन्स लांबा किरण शिंदे व त्यांच्या सात ते आठ साथीदारांनी मागील भांडणाची कुरापत काढून कुलथे यांच्या घरावर तुफान दगडफेक केली. दगडफेक एवढी भयाण होतो की, खिडकीच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.  या घटनेनंतर कुलथे यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता घरावर हल्ला करणाऱ्या आरोपीं वर क** कारवाई करण्यात येईल असे सांगितले याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश न्याय दे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु अद्याप याप्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
Bhagwat Udavant

Recent Posts

जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल जालन्याच्या जिल्हाधिकारी,

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…

11 hours ago

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती!

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर  : साजिद…

18 hours ago

विवाह हा संस्कार

भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…

18 hours ago

श्रावण सफल व्हावा…

श्रावणमास सुरू होतो तसे निसर्गात आल्हाददायक बदल घडू लागतात. आभाळात पांढर्‍याशुभ्र पिंजलेल्या कापसाची नक्षी उमटू…

18 hours ago

एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास

एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…

2 days ago

सर्प विज्ञानाची गरज

ह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा:। नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा॥ ब्रह्मलोकामधील सर्व सर्पांचा राजा नागदेव…

2 days ago